आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 कसोटींच्या 17 डावांत टीम इंडियाचे सलामीवीर अपयशी!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पुण्यात पहिली कसोटी मोठ्या ३३३ धावांच्या अंतराने गमावल्यानंतर आता टीम इंडियाच्या सलामी जोडीचे अपयश प्रखरपणे दिसून येत आहे. पुणे कसोटीत एकदाही चांगली सुरुवात मिळू शकली नाही. परिणामी याचा दबाव मधल्या फळीच्या फलंदाजांवर आला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पुणे कसोटीत मुरली विजय आणि लोकेश राहुल या सलामी जोडीने पहिल्या डावात २६ धावा, तर दुसऱ्या डावात १० धावा जोडल्या होत्या.  

न्यूझीलंड, इंग्लंड आणि बांगलादेशविरुद्ध मागच्या तीन मालिकांत भारताने सलामीला विविध खेळाडूंना आजमावले.  मात्र, एकाही जोडीत स्थैर्य दिसले नाही. या मालिकेत लोकेश राहुल, मुरली विजय, शिखर धवन, गौतम गंभीर आणि पार्थिव पटेल यांना आजमावण्यात आले. भारताला सलामीवीरांकडून ज्या चांगल्या सुरुवातीची आशा होती, ती मागच्या १० कसोटींपैकी फक्त एका सामन्यात मिळाली. भारताने इंग्लंडविरुद्ध चेन्नईत झालेल्या पाचव्या आणि अखेरच्या कसोटीत पहिल्या विकेटसाठी १५२ धावांची भागीदारी केली. ही मागच्या १० कसोटींतील एकमेव शतकी भागीदारी होती. त्या सामन्यात लोकेश राहुलने १९९, तर पार्थिव पटेलने अर्धशतक ठोकताना ७१ धावा काढल्या होत्या.  

भारत वि. बांगलादेश: बांगलादेशविरुद्ध हैदराबादेत झालेल्या एकमेव कसोटीत भारताच्या सलामीवीरांनी २ धावा काढल्या. या दोन धावा लाेकेश राहुलने काढल्या. 

इंग्लंडविरुद्धही सुमार 
इंग्लंडविरुद्ध राजकोट येथे झालेल्या पहिल्या कसोटीत विजय आणि गंभीरने पहिल्या डावात ६८ आणि दुसऱ्या डावात ० धावांची सलामी दिली. विशाखापट्टणमला झालेल्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात ६ आणि दुसऱ्या डावात १६ धावांची सलामी भागीदारी झाली. या कसोटीत मुरलीने २० आणि राहुलने १० धावा काढल्या. मोहाली कसोटीत ३९ आणि ७ धावांची सलामी भारतीयांनी दिली. चौथ्या कसोटीत मुरली-राहुलने ९९ आणि ३९ धावांची सलामी दिली. चेन्नई कसोटीत पहिल्या डावात ७ धावांची सलामी दिली.

किवींविरुद्धही फ्लॉप 
पहिली कसोटी : ४२ आणि ५२ (राहुल-विजय), दुसरी कसोटी : १ आणि १२ (धवन-मुरली विजय), तिसरी कसोटी : २६ आणि ३४. (विजय-गंभीर)

भारतीय खेळाडूंनी केले ट्रेकिंग 
पराभव विसरण्यासाठी आणि येणाऱ्या आव्हानांचा प्रखरपणे  सामना करण्यासाठी टीम इंडियाने पुण्याजवळील डोंगरात ट्रेकिंग केले. कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार अजिंक्य रहाणे, आर. अश्विन, चेतेश्वर पुजारा, रवींद्र जडेजा, मुरली विजय या खेळाडूंनी ट्रेकिंग केले. या खेळाडूंनी आपले फोटो सोशल मीडियावर शेअरही केली. अजिंक्य रहाणे आणि उमेश यादव यांनी पत्नीसह ट्रेकिंगचा आनंद लुटला. पुण्याहून ८० किमी दूर तामाहिनी घाटावर हे ट्रेकिंग झाले.  

भारताला धडा
पुणे कसोटीचा  पराभव भारतीय संघासाठी एक प्रकारे धडा मिळाला आहे. अापण देशासाठी खेळतो तेव्हा याच्या गौरवासाठी खेळत असतो. संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध अत्यंत सुमार प्रदर्शन केले. आता यातून सावरून पुढच्या सामन्यात विजयासाठी सर्वस्व झोकून प्रयत्न करणे गरजेेचे आहे - व्ही.व्ही.एस. लक्ष्मण, माजी खेळाडू.

वैयक्तिक कामगिरीत दोघांचे प्रदर्शन चांगले 
राहुल- मुरली विजय या दोघांनी वैयक्तिक पातळीवर शतके ठोकली. मुरली विजयने इंग्लंडविरुद्ध २ शतके आणि बांगलादेशविरुद्ध एक शतक काढले. राहुलनेसुद्धा इंग्लंडविरुद्ध चेन्नईत १९९ धावा काढल्या होत्या.
बातम्या आणखी आहेत...