आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • 101 Year Old Man Kaura, 200 Meters Even Gold; The First Woman In The World To Run After Centuries ..!

101 वर्षीय मन कौरला 200 मी. मध्येही सुवर्ण; शंभरीनंतर धावणारी जगातील पहिली महिला..!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 ऑकलंड- १०१ वर्षांच्या मन कौर यांनी वर्ल्ड मास्टर्स गेम्समध्ये २०० मीटर शर्यतीतही सुवर्णपदक जिंकले आहे. भारताच्या मन कौरने २.५८ मिनिटांचा वेळ काढला. १०० पेक्षा अधिक वयोगटात २०० मीटर शर्यतीत सहभागी झालेली मन कौर जगातील पहिली महिला धावपटू ठरली आहे. मन कौरने सोमवारी १०० मीटर शर्यतीत विश्वविक्रमासह सुवर्णपदक जिंकले होते. जगाच्या इतिहासात प्रथमच एखाद्या महिला खेळाडूने वयाची १०० वर्षे पूर्ण झाल्यानंतर १०० आणि २०० मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम केला. पुरुष गटात भारताच्या फौजा सिंग यांनी एका निमंत्रितांच्या स्पर्धेत ही कामगिरी केली आहे.
 
मन कौर यांना गोळाफेकीत सुवर्णपदक :
मनकौर यांनी या स्पर्धेत गोळा फेकीतही दमदार प्रदर्शन करून सुवर्णपदक जिंकले. मन कौर यांनी २.१ मीटर दूर गोळा फेकून पदक आपल्या नावे केले. त्यांच्या एकूण पदकांची संख्या १९ झाली आहे. 
 
२०११ मध्ये स्प्रिंट डबल चॅम्पियन 
मन कौर यांनी २०११ मध्ये वर्ल्ड मास्टर्स चॅम्पियनशिपच्या १०० आणि २०० मीटर शर्यतीतही सुवर्णपदक जिंकले होते. त्या वेळी मन कौर स्पर्धेत 
स्प्रिंट डबल चॅम्पियन ठरल्या होत्या.
बातम्या आणखी आहेत...