आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 105 Year Old Japanese Runner Creates 100m World Record

105 वर्षीय जपानी धावपटूचा 42 सेकंदात विश्‍वविक्रम, बोल्टला पुन्‍हा आव्‍हान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्योटो (जपान)- जपानचे 105 वर्षीय धावपटू हिदेकिची मियाजाकी यांनी 100 मीटर रेसमध्‍ये नवीन विक्रम केला आहे. 105 वर्ष वयोगटात त्‍यांनी 42.22 सेकंदात विक्रम केला आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्‍ये त्‍यांच्‍या नावाची नोंद झाली आहे. तीन दिवसांपुर्वी मियाजाकी यांनी वाढदिवस साजरा केला. त्‍यांच्‍या हा विक्रम उसेन बोल्‍टच्‍या रेसलाही आव्‍हान देणारा ठरत असल्‍याचे म्‍हटले जात आहे.
बोल्‍टसोबत धावण्‍याची होती इच्‍छा
2014 मध्‍ये एक रेस जिंकल्‍यानंतर मियाजाकी यांनी एका मुलाखतीत म्‍हटले होते की, “ उसेन बोल्‍टसोबत धावणे हे माझे स्‍वप्‍न आहे. मला असे वाटते की, त्‍याच्‍यासोबत माझी रेस लागली तर, मी केवळ त्‍याला टक्‍करच देणार नाही, तर जिंकेलही.''
मियाजाकी यांना भेटण्‍याची बोल्‍टची इच्‍छा
मागील महिन्‍यात जागतिक ऍथलेटिक्स स्पर्धेत बोल्टच्‍या चमकदार कामगिरीवर मियाजाकी म्‍हणाले होते, '' बोल्‍टची आजपर्यंत माझ्याशी रेस झाली नाही, दोन तीन वर्षांपुर्वी बोल्ट जपानला आला होता. त्‍याने मला भेटण्‍याची इच्‍छाही व्‍यक्‍त केली होती. मात्र त्‍यावेळी मी येथे नव्‍हतो. तो मला न भेटताच परतला, मला याचे अजुनही वाईट वाटते.”
35 सेकंदाचे टार्गेट
मियाजाकी म्‍हणाले, “रेस दरम्‍यान माझ्या डोळ्यात अश्रू येत होते, कारण मी स्‍लो होत होतो. मी म्‍हातारा झालो म्‍हणून मला असे वाटत होते. मला चांगले प्रशिक्षण घेण्‍याची गरज आहे. मी 35 सेकंदाचे टार्गेट सेट करून धावलो.”
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, संबंधित फोटो..