आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिओ ऑलिम्पिक- सोळा दिवसांत मोडले १७ विश्वविक्रम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सर्वांच्या अपेक्षानुसार ब्राझीलने ३१ व्या ऑलिम्पिकचे यशस्वी आयोजन केले. १६ दिवस चाललेल्या या खेळाच्या महाकुंभात आर्श्चयकारक प्रदर्शन आणि धक्कादायक गोष्टी पाहायला मिळाल्या. अमेरिकेने पुन्हा सिद्ध केले की, आपणच ऑलिम्पिकमधील महाशक्ती आहोत. इंग्लंड १०८ वर्षांत पहिल्यांदा पदकतालिकेत दुसऱ्यास्थानी पोहोचला. पाच सुवर्णांसह एकूण सहा पदकांसह अमेरिकेचा मायकल फेल्प्स या ऑलिम्पिकमधील सर्वश्रेष्ठ खेळाडू ठरला. दुसरीकडे जमैकाच्या १०० मीटरचा बादशहा युसेन बोल्ट पदकांची हॅट््ट्रिकची हॅट््ट्रिक करणारा एकमेव खेळाडू ठरला.

रिओतील इतर रोमांचक आकडे आणि विक्रम
- २७ विश्वविक्रम बनले रिओ ऑलिम्पिकमध्ये जलतरण आणि वेट लिफ्टिंगमध्ये सर्वाधिक आठ-आठ, ट्रॅक सायकलिंगमध्ये सात, अॅथलेटिक्समध्ये ३ आणि तिरंदाजीत एक विश्वविक्रम बनला.
- ९१ ऑलिम्पिक विक्रमांची नोंद, भारताच्या ललिता बाबरने स्टीपल चेजमध्ये राष्ट्रीय विक्रम रचला. सायकलिंगमध्ये एकच विक्रम तीन वेळा तुटला.
ऐतिहासिक कामगिरी
- फिजी, जॉर्डन व कोसोवो या तीन देशांनी ऑलिम्पिकच्या इतिहासात पहिल्यांदा पदक जिंकले. - चीनचा वू मिनजिया ५ सुवर्णपदक जिंकणारा जगातील पहिला डायव्हर बनला.
- दक्षिण कोरियाच्या तिरंदाजांनी सर्व चार सुवर्ण जिंकून क्लीन स्वीप दिला. ऑलिम्पिकच्या तिरंदाजीत हे पहिल्यांदा घडले.
- मायकल फेल्प्सने पाच सुवर्ण आणि एक रौप्यपदक जिंकले. त्याची ऑलिम्पिक पदकांची संख्या २८ झाली. यात २३ सुवर्णांचा समावेश आहे.
- इंग्लंडच्या अँडी मरेने टेनिसमध्ये पुरुष एकेरीत सलग दोन सुवर्ण जिंकले. सलग दोन वेळा पदके जिंकणारा तो एकमेव खेळाडू ठरला.
युसेन बोल्टने सलग तिसऱ्यांदा ऑलिम्पिकमध्ये तीन सुवर्ण जिंकले. अशी कामगिरी करणारा तो एकमेव धावपटू ठरला आहे.
भारताचा अपेक्षाभंग
- या ऑलिम्पिकमध्ये भारताची तीन पदके थोडक्यात हुकली. नेमबाजीत अभिनव बिंद्रा, जिम्नॅस्टिकमध्ये दीपा कर्माकर आणि टेनिसच्या मिश्र दुहेरीत सानिया मिर्झा व रोहन बोपन्ना जोडी चौथ्या स्थानावर राहिली.
- ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंत १२ वेळा भारतीय खेळाडू चौथ्या स्थानावर राहिले आहेत. यामध्ये एम. एस. जाधव (१९५२), मिल्खा सिंग (१९६०), प्रेम कुमार (१९७२), सुदेश नाथ (१९७२), पी.टी. उषा (१९८४), राजिंदर सिंग (१९८४), पेस-भूपती (२००४), कुंजुराणीदेवी (२००४), जोयदीप कर्माकर (२०१२) या सर्व खेळाडूंची पदके थोडक्यात हुकली.
- अमेरिकेने ४३ सुवर्णपदकांसह सलग दुसऱ्यांदा आणि एकूण १७ वेळा पदकतालिकेत पहिले स्थान पटकावले. अमेरिकेने १९८४ नंतर यंदा एकूण ११६ पदके जिंकली. ऑलिम्पिकमध्ये अमेरिकेची आता १०२२ सुवर्ण व एकूण २५२५ पदके झाली आहेत.
बातम्या आणखी आहेत...