आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कबड्डी विश्वचषक : कोरियाविरुद्ध भारत पराभूत; अाज अाॅस्ट्रेलियाचे अाव्हान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद - शेवटच्या क्षणी सामन्याला कलाटणी देऊन दक्षिण कोरिया टीमने शुक्रवारी विश्वचषक कबड्डी स्पर्धेत शानदार विजयी सलामी दिली. काेरियाने रंगतदार सामन्यात यजमान भारताला ३४-३१ अशा फरकाने धूळ चारली. जान कुन्ह लीने उत्कृष्ट चढाई करून कोरियासाठी विजयश्री खेचून अाणली. यासह दाेन वेळच्या विश्वविजेत्या भारताला अापल्या घरच्या मैदानावर सलामीला पराभवाचा सामना करावा लागला. अाता भारताचा स्पर्धेतील दुसरा सामना शनिवारी अाॅस्ट्रेलियाविरुद्ध हाेणार अाहे. अाता अाॅस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यात बाजी मारून विजयी ट्रॅकवर परतण्याचा यजमानांचा प्रयत्न असेल.

अनुप कुमारच्या नेतृत्वाखाली भारताने दमदार सुरुवात केली. त्यामुळे यजमानांना मध्यंतरापूर्वी काेरियाला अाॅल अाऊट करून अाघाडी घेता अाली हाेती. मात्र, काेरियाने सामन्यात बाजी मारली.

मान्यवरांची गर्दी
विश्वचषक कबड्डी स्पर्धेचा उद््घाटन साेहळा माेठ्या उत्साहात पार पडला. या वेळी महासंघाचे जनार्दन गेहलाेतसह अनेक मान्यवर उपस्थित हाेते. सिनअेभिनेता अभिषेक बच्चन, सुनील शेट्टीनेही खास हजेरी लावली हाेती.
बातम्या आणखी आहेत...