आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रीमियर बॅडमिंटन लीग आजपासून

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - माजी पुरस्कर्त्यांच्या अडथळ्यांचे आव्हान आणि क्रिकेटवेड्या क्रीडारसिकांच्या भारतात बॅडमिंटन या खेळाबाबतचे आकर्षण निर्माण करण्याची ईर्षा या जिद्दीने नव्या वर्षाच्या सुरुवातीला मैदानात उतरलेल्या प्रीमियर बॅडमिंटन लीगचे उद्या मुंबईत धूमधडाक्यात उद््घाटन होईल. जॅकलिन फर्नांडिस आणि सलीम-सुलेमान उपस्थितांचे व टेलिव्हिजन प्रेक्षकांचे किती मनोरंजन करतील, हा प्रश्न अनुत्तरित असला तरीही जागतिक बॅडमिंटन क्षेत्रातील अव्वल खेळाडूंच्या उपस्थितीमुळे ‘लीग’ चर्चेचा विषय ठरेल, असा विश्वास आयोजकांचा आहे.

‘स्पोर्टी सोल्युशन’कडे पहिल्यावहिल्या भारतीय बॅडमिंटन लीगचे प्रायोजकत्व दिल्यानंतर या लीगचा दुसरा अध्याय होऊच शकला नाही. त्या अनुभवातून शहाणे झालेल्या भारतीय बॅडमिंटन संघटनेने बीसीसीआयप्रमाणे स्वत:च आपल्या लीगचे आयोजन यंदापासून करण्याचा घेतलेला निर्णय कितपत योग्य आहे ते येत्या दोन आठवड्यांत स्पष्ट होईल.

सिंधू, सायनावर नजर
प्रेक्षकांना दर्जेदार खेळाडू पाहता यावेत या दृष्टीने भारताचे सायना नेहवाल, पी.व्ही. सिंधू, स्पेनची विश्वविजेती कॅरोलिना मरिना, माजी विश्वविजेता ली चुंग वेई आदी नामवंत खेळाडूंचा खेळही दर्जेदार मेजवानी असेल. या सर्व युवा खेळाडूंवर चाहत्यांची खास नजर असेल.
“१५-१५ पॉइंट गेममुळे प्रत्येक स्पर्धकाला गाफील राहून चालणार नाही, असे पी. व्ही. सिंधू म्हणत होती. कोणत्याही बेसावध क्षणी प्रतिस्पर्धी गेम जिंकू शकतो. त्यामुळे मोठ्या खेळाडूंनादेखील सावधपणे खेळावे लागणार आहे. महिलांमध्ये सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधू यांच्याव्यतिरिक्त सोनी ड्वी कुनकोरो, सायमन सँटोसो, प्रनाव जेरी, ख्रिस अॅड्कूक यांच्या खेळाचीही बॅडमिंटन शौकीन आतुरतेने वाट पाहत आहेत.

ट्रम्प मॅचेस आणि सडनडेथचा नियम याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. वेगवान आणि नव्या बदललेल्या नियमाने खेळल्या जाणाऱ्या लीगचा सामन्यांचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट््सवर नावीन्यपूर्ण पद्धतीने करण्यात येणार आहे. उदाहरणार्थ खेळाडूंच्या हृदयाचे सामन्यादरम्यानचे ठोके स्क्रीनवर दाखवले जातील.

वेगवान स्मॅश, ब्रेस्ट रॅली, दिवसाचा सर्वोत्तम खेळाडू आणि सर्वोत्तम प्रेक्षक असे ४ पुरस्कार रोज दिले जातील. रंगीत प्रकाशझोत आणि रॉक संगीत हे मोकळ्या वेळेतील प्रेक्षकांचे मनोरंजन हाेणार आहे. तसेच या स्पर्धेतील विजेत्यांवर काेट्यवधी रुपयांच्या बक्षिसांचा वर्षाव केला जाणार आहे,असेही आयाेजकांनी जाहिर केले.

सायनासाेबत खेळण्यास उत्सुक : वृषाली
जगातील माजी नंबर वन सायना नेहवालसाेबत खेळण्यास मी अधिक उत्सुक आहे. अशा प्रकारची संधी मिळत असल्याने मी स्वत:ला भाग्यवान खेळाडू समजते, अशी प्रतिक्रिया भारताची युवा बॅडमिंटनपटू जी. वृषालीने दिली. शनिवारपासून पहिल्या सत्राच्या प्रीमियर बॅडमिंटन लीगला सुरुवात हाेत आहे. आॅलिम्पिक पदक विजेती सायना नेहवाल या लीगमध्ये अवध वाॅरियर्सचे प्रतिनिधित्व करणार आहे. याच टीममध्ये युवा खेळाडू वृषालीही सहभागी आहे. ‘सायनाच्या टीमकडून खेळणे हे प्रत्येक युवा खेळाडूचे स्वप्न असते. हीच स्वप्नपूर्ती आता माझी हाेत आहे. मला तिच्या संघाकडून लीगमध्ये खेळण्याची संधी मिळत आहे. हेच माझ्यासाठी अधिक महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे या टीमसाठी अव्वल कामगिरी करण्याचा माझा प्रयत्न असेल. यासाठी आत्मविश्वास दुणावला आहे. याचा निश्चित मला फायदा हाेईल,’ असेही वृषाली म्हणाली.

नवा नियम सर्वांसाठी फायदेशीर : गाेपीचंद
बॅडमिंटन लीगमध्ये नव्याने समाविष्ट करण्यात आलेला ट्रम्प मॅचचा नियम हा खेळाडू आणि चाहत्यांसाठी अधिक फायदेशीर ठरणारा आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय प्रशिक्षक पी. गाेपीचंद यांनी दिली. स्पर्धेत आता हा नवीन नियम लागू करण्यात आला. प्रत्येक टीमला आपल्या पाचपैकी एका सामन्याला ट्रम्प मॅच म्हणून घाेषित करावे लागेल. तसेच काेणत्याही फ्रँचायझीला सामन्याच्या अडीच तासांपूर्वी आपली टीम जाहीर करावी लागणार आहे. ‘हा नियम खेळाडूंच्या हितासाठी अधिक महत्त्वपूर्ण आणि फायदेशीर आहे,’ असेही ते म्हणाले.

मुंबईसमाेर सायनाचे आज आव्हान
यजमान मुंबई राॅकेट्स टीमला आपल्या घरच्या मैदानावर सायना नेहवालच्या अवध वाॅरियर्सच्या तगड्या आव्हानाला सामाेरे जावे लागेल. त्यामुळे यजमान टीमला सलामीच्या सामन्यात विजयासाठी कसरत करावी लागेल. अवध वाॅरियर्समध्ये सायनाच्या नेतृत्वात साई प्रणीत, साैरभ वर्मा, जी.वृशालीचा समावेश आहे.

उद‌्घाटन सोहळ्यात ‘हल्ला मचा दे’ उडवणार धमाल
शनिवारी सुरू हाेणाऱ्या पहिल्या सत्राच्या पीबीएलमध्ये ‘हल्ला मचा दे’ हे गीत धमाल उडवणार आहे. प्रसिद्ध संगीतकार सलीम-सुलेमानद्वारे हे गीत तयार करण्यात आले. हे गीत गुरुवारी लाँच करण्यात आले. हे गीत उपस्थित चाहत्यांना अधिक आवडेल, असा आयाेजकांना विश्वास आहे. उद््घाटन साेहळ्यादरम्यान हे गीत सादर करण्यात येईल.
बातम्या आणखी आहेत...