आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घोषणा होते, निधी मंजूर; आयोजनात अनियमितता; स्‍पर्धेसाठी 50 पैकी 35 लाखांची मंजुरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - घोषणा होते, निधी मंजूर होतो. परंतु, प्रत्यक्षात स्पर्धा आयोजन करण्यात अनियमितता असते. ही व्यथा आहे राज्य शासनाच्या क्रीडा खात्याची. याचे कारण संबधित जिल्हा क्रीडाधिकारी, क्रीडा उपसंचालक व राज्य संघटना यांच्यात समन्वय नसणे. समन्वय झाला तर संबंधित जिल्हा क्रीडाधिकारी व क्रीडा उपसंचालक यांनी तातडीने अंमलबजावणी न केल्यामुळे राज्य शासनाच्या मानाच्या क्रीडा स्पर्धा प्रतिवर्षी नियमितपणे झाल्या नाहीत. 

सोलापूरला दोन वर्षापूर्वी मिळालेली कुस्ती स्पर्धा हेही या स्पर्धांचे प्रमुख कारण आहे. गतवर्षी कुस्ती स्पर्धा नाशकात दोन दिवसात गुंडाळण्यात आली. कुस्ती वगळता कबड्डी, खो-खो व व्हॉलिबॉल या स्पर्धा निधी मंजूर होऊनही गेल्या दोन वर्षापासून होऊ शकल्या नाहीत. 

क्रीडाधोरणानुसार महाराष्ट्राच्या मातीतल्या खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी, खेळाडूंच्या कामगिरीत सुधारणा होण्यासाठी प्रतिवर्षी  (स्व.) खाशाबा जाधव कुस्ती, छत्रपती शिवाजी करंडक कबड्डी व व्हॉलिबॉल आणि भाई नेरूरकर करडंक खो-खो स्पर्धेचे राज्य आयोजन करण्यात येणार असल्याची प्रतीवर्षी घोषणा राज्याच्या क्रीडा खात्याकडूून होते. या स्पर्धेसाठी ५० लाखाच्या निधीची अर्थसंकल्पीय तरतूद असते. परंतु प्रत्येक वर्षी ३५ लाखांची मंजूरी देण्यात येते. त्यानुसार या स्पर्धा राज्यात वेगवेगळ्या  ठिकाणी घेतल्या जातात. राज्य संघटनेच्या शिफारशीनुसार या स्पर्धा संबंधित जिल्हा संघटनाना देण्यात येतात. काही संघटनाच्या राज्यात दोन संघटना असल्यामुळे त्यांनाही या स्पर्धा अायोजनची संधी मिळते. यंंदाही ३५ लाखांची मंजूरी राज्य शासनाने नुकतीच दिली अाहे. त्यानुसार कुस्ती मुंबईत, व्हॉलिबॉल नागपूरात, कबड्डी नगर व खो-खो इंचलकरंजीत होणार असल्याचे नियोजन राज्य संघटनांनी केले. परंतु यंदाच्या वर्षी तरी या स्पर्धा होणार का? हे प्रश्नचिन्ह राज्य संघटनेसमोर आहे. 

ठोस पावले उचलणे गरजेचे
गेल्या दोन वर्षांपासून निधीची तरतूद होते. परंतु स्पर्धा घेण्याबाबत ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. दोन वर्षापूर्वी क्रीडामंत्र्यांनी मुंबईत खो-खो स्पर्धा घ्या,असे सांगितले. परंतु त्या झाल्या नाही. यंदा इचलकरंजीत होतील. 
-प्रा. डॉ. चंद्रजित जाधव, सचिव राज्य खो-खो 
बातम्या आणखी आहेत...