आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यातील 5 धनुर्धरांची भारतीय संघात निवड; राज्याच्या तिरंदाजांचे ऐतिहासिक यश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साक्षी शिटोले - Divya Marathi
साक्षी शिटोले
अमरावती- अर्जेंटिना येथील विश्व धनुर्विद्या चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होणाऱ्या भारतीय तिरंदाजी संघाची िनवड चाचणी रोहतक हरियाणा येथे २ व ३ सप्टेंबर या कालावधीत घेण्यात आली. या चाचणीत अव्वल स्थान िमळवून राज्यातील पाच धनुर्धरांनी भारतीय संघात स्थान पटकावले. राज्याच्या इतिहासात भारतीय धनुर्विद्या संघात एवढ्या मोठ्या संख्येत धनुर्धरांनी पहिल्यांदा स्थान मिळवले अाहे.
 
ज्युनियर कंपाउंड प्रकारात अमरावतीची पूर्वशा शेंडे, ज्युनियर रिकर्व्ह प्रकारात अमरावतीचाच शुकमणी बाबरेकर, सबज्युनियर िरकर्व्ह प्रकारात प्रथम स्थान िमळवून नाशिकचा गौरव लांबे, सबज्युनियर रिकर्व्ह प्रकारात प्रथम क्रमांक पटकावून नगर/पुण्याची साक्षी राजेंद्र शितोळे व ज्युनियर कंपाउंड प्रकारात जालन्याची मृणाल अनिल हिवराळे यांनी भारतीय धनुर्विद्या संघात स्थान पटकावले.   यातूनच राज्याला आॅलिम्पिकमध्ये सहभागी होणारा धनुर्धर िमळेल. सध्या आॅलिम्पिकमध्ये िरकर्व्ह प्रकाराचाच समावेश आहे. त्याचप्रमाणे कंपाउंड प्रकाराचाही समावेश व्हावा, असे जोरदार प्रयत्न सुरू आहेत.    
 
पूर्वशाने आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला सांघिक कांस्यपदक जिंकून िदले असून शुकमणीही याआधी आशियाई चॅम्पियनशिपमध्ये सहभागी झाला आहे. त्याचप्रमाणे गौरव, साक्षी आणि मृणाल यांनाही आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळण्याचा अनुभव आहे.    

भारतीय संघात िनवड झालेल्या खेळाडूंचे राज्य धनुर्विद्या संघटनेचे अध्यक्ष अॅड. प्रशांत देशपांडे, सचिव प्रमोद चांदूरकर, क्रीडा उपसंचालक प्रतिभा देशमुख, नाशिकचे क्रीडा उपसंचालक डाॅ. जयप्रकाश दुबळे, जिल्हा क्रीडा अधिकारी व धनुर्विद्या प्रबोधिनीचे गणेश जाधव,  प्राचार्य डाॅ. विजयकुमार भांगडिया, क्रीडा विभाग संचालक सतीश मोदाणी, डाॅ. गजेंद्र रघुवंशी व संपूर्ण धनुर्विद्या वर्तुळाने अभिनंदन केले.
 
पाचही धनुर्धरांकडून कामगिरीचा विश्वास
पाचही धनुर्धर सध्या जोरदार कामगिरी करीत आहेत. त्यामुळेच त्यांनी भारतीय संघात स्थान पटकावले. विश्व धनुर्विद्या स्पर्धेतही ते उत्तम कामगिरी करतील असा मला विश्वास आहे. त्यांनी िनवड चाचणीत अव्वलस्थान िमळवून आमच्या आशा वाढवल्या आहेत. ही त्यांच्यासाठीही सुवर्णसंधी आहे, असे मत भारतीय धनुर्विद्या संघाचे प्रशिक्षक अभिजित दळवी यांनी व्यक्त केले.
 
पुढील स्‍लाईडवर पहा कोणते आहे खेळाडु... 
बातम्या आणखी आहेत...