आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्राचे चारही संघ उपांत्य फेरीत दाखल, पंजाब, मध्य प्रदेश, दिल्ली सेमीफायनलमध्ये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- क्रीडा व युवक सेवा संचालनालयातर्फे आयोजित ६१ व्या राष्ट्रीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत दुसऱ्या दिवशी चारही गटांतील यजमान महाराष्ट्राच्या खेळाडूंनी उपांत्य फेरीत प्रवेश केला.

विभागीय क्रीडा संकुलात सुरू असलेल्या स्पर्धेत १४ वर्षे मुलींच्या गटात उपांत्यपूर्व फेरीत महाराष्ट्राने कर्नाटकावर २-० ने मात केली. यात एकेरीच्या लढतीत तनिष्का देशपांडेने पी. नियतीवर २१-०६, २१-१२ अशी मात केली. दुहेरीमध्ये रुद्रा राणे व अनन्या फडके या जाेडीने नियती व बलोरिया जोडीला २१-०९, २१-१० ने पराभूत करत उपांत्य फेरी गाठली. आता महाराष्ट्रासमाेर आसामचे आव्हान असेल. मुलांच्या गटात महाराष्ट्राने हरियाणावर रोमांचक लढतीत २-१ ने शानदार विजय मिळवला. एकेरीमध्ये वेदांतने मानवरवर अटीतटीच्या लढतीत १९-२१, २१-०८, २१-१० अशा फरकाने पराभूत केले. महाराष्ट्राच्या वेदांतने पहिला सेट गमावल्यानंतर आक्रमक खेळून उत्कृष्ट स्मॅशचा वापर करत सलग दोन सेटमध्ये दमदार कामगिरी करत सामना आपल्या खिशात घातला. दुहेरीमध्ये हरियाणाने महाराष्ट्राला हरवले. यात हरियाणाच्या जयंत राणा व हर्ष अरोरा या जोडीने महाराष्ट्राच्या रोहन गुरबाणी व सुधांशू बोहर या जोडीला २१-१८, २१-१७ अशा सरळ दोन सेटमध्ये पराभूत केले. निर्णायक तिसऱ्या एकेरी लढतीत रोहन गुरबाणीने जयंत राणावर २१-१४, २१-१६ ने मात करत महाराष्ट्राला उपांत्य फेरीत पोहोचवले.

महाराष्ट्राची मध्य प्रदेशवर मात
मुलींच्या १९ वर्षांखालील गटात महाराष्ट्राने मध्य प्रदेशवर २-० ने सहज मात केली. एकेरीच्या लढतीत मुग्धा आर्याने रेश्मावर २१-३, २१-५ अशा फरकाने विजय मिळवला. दुहेरीमध्ये अदिती काळे व करिना मदन जोडीने श्रेया राऊतकर व फौजिया खान जोडीला २१-१३, २१-६ ने पराभूत केले. आता महाराष्ट्राचा सामना तामिळनाडूशी होईल. मुलांमध्ये महाराष्ट्राने उत्तर प्रदशेला २-० ने हरवले. एकेरीत अनिरुद्ध मयेकरनने सुमीत लोहारला २१-१४, २१-११ ने पराभवाचा धक्का दिला. दुहेरीमध्ये साई सिद्धार्थ रेड्डी व वृषभ देशपांडेने सुमीत लाेहार व समुद्र पांडे जोडीला २१-१२, २१-१३ ने नमवले.
बातम्या आणखी आहेत...