आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सायकलपटू गाठणार 645 किमीचा पल्ला! दृष्टिहीन स्पर्धकांचे पथक हे वेगळेपण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पाचव्या पुणे-गोवा ६४५ कि.मी.डेक्कन क्लिफहँगर सायकल शर्यतीला शनिवारी सुरुवात हाेणार अाहे. या  स्पर्धेत वैयक्तिक (सोलो) गटात ३६ सायकलपटूंसह, सांघिक प्रकारात ३६ क्लबने आपला सहभाग नोंदविला आहे.या शर्यतीमध्ये दृष्टिहीनांच्या पथकाने खास सहभाग घेतला अाहे. हे पथक शर्यतीचे निश्चित केलेले अंतर गाठण्यासाठी सज्ज झालेले अाहे. त्यामुळे या शर्यतीकडे चाहत्यांचे खास लक्ष लागले अाहे. या वेळी या विशेष पथकावर सर्वांची नजर असेल. 
 
‘भारतातील अल्ट्रा सायकलींसाठी प्रसिद्ध असलेले पुणे येथे यावर्षी आयोजित या स्पर्धेत  चेन्नई, मंगळूर,चिकमंगलूर, कोईम्बतूर, बँगलोर, मैसूर, नवी दिल्ली, कोलकाता,रुरकेला, अहमदाबाद, सुरत आणि द्वारका या ठिकांणाहून सायकलपटू सहभागी झाले आहेत. स्पर्धकांना पुणे ते गोवा (महाबळेश्वर आणि बेळगाव मार्गे)६४५  कि.मी. अंतराचा टप्पा पूर्ण करायचा अाहे. यामध्ये सायकलपटूंना महाबळेश्वर येथील घाट व दरी, सह्याद्री पर्वतरांगाच्या छायेतून चोरला घाट, कोकण येथील गर्द आणि वळणावळणाचा खडतर मार्ग पूर्ण करण्याचे आव्हान असणार आहे. ही शर्यत गोवा येथील बोगमालो समुद्रकिनाऱ्यावर समराेप हाेईल. स्पर्धकांना हिरवळ आणि रस्त्याच्या दुतर्फा  असलेली नारळाची झाडे अनुभवायला मिळणार आहेत”, अशी माहिती स्पर्धेच्या संचालिका सायकलिस्ट दिव्या ताटे यांनी दिली. त्या  फ्रांसमधील १२०० किमी शर्यतीस पात्र ठरलेल्या पहिल्या भारतीय महिला आणि अल्ट्रा सायकलिस्ट अाहेत.   
 
नामवंतांच्या सहभागाने चुरस  
स्पर्धेत वैयक्तिक (सोलो) प्रकारात ६२ वर्षीय मोहिंदर सिंग भराज, नागपूरचा  १९  वर्षीय शुभम दास  सहभागी झाले आहेत. ५० वर्षांवरील गटात दोन वेळा आयर्नमॅन पूर्ण करणारा मुंबईचा आनंद पाटील, पुण्याचा अविनाश नाशिकचा आयपीएस अधिकारी रवींद्र सिंगल हे सायकलपटू सहभागी होत असल्यामुळे यावर्षी नक्कीच चुरस पाहायला मिळणार आहे.
बातम्या आणखी आहेत...