आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थायलंडच्‍या या धावपटूचे वय आहे 65 वर्षे, 20 वर्षांत 13 देशांत धावले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हनोई (व्हिएतनाम) - ते ६५ वर्षांचे वयस्क आहेत. मात्र, त्यांनी शनिवारी येथील सर्वात उंच बिल्डिंगमध्ये व्हर्टिकल शर्यतीत भाग घेतला. ७२ माळ्याच्या या बिल्डिंगमध्ये १९१४ पायऱ्या आहेत. व्हर्टिकल रेसमध्ये धावपटूला बिल्डिंगच्या पायऱ्यावर चढावे, उतरावे लागते.
त्यांनी चौथ्यांदा व्हिएतनाममध्ये व्हर्टिकल रेसमध्ये सहभाग घेतला. या स्पर्धेत सहभागी झालेले ते सर्वात वयस्क धावपटू होते... ही गोष्ट आहे थायलंडचे सेपतूआजेनिरियन अमनाज प्रोम्पिनन यांची. प्रोम्पिनन यांचे धावण्यावर खूप प्रेम आहे. यामुळे ते स्वस्थ आणि फिट असतात. प्रोम्पिनन म्हणतात, “मी मागच्या २० वर्षांपासून रनिंग करत आहे. मी मॅरेथाॅन आणि व्हर्टिकल रेसमध्ये सहभागी होतो. बँकॉकमध्ये माझे ऑफिस अशा कार्यालयात होते, जेथे ३० माळे होते. मी लिफ्टचा उपयोग करीत नसे. पायऱ्यानेच ये-जा करत असे. येथूनच माझी रनिंग सुरू झाली. सरावासाठी मी आठवड्यातून दोन दिवस सलग चार वेळा ब्रेक न घेता पायऱ्या चढत आणि उतरत असे. रोज सकाळीसुद्धा धावत असे. हे माझे छंद झाले. मी बऱ्याच वेळा बँकॉक येथे होणाऱ्या मॅरेथॉन शर्यतीतही सहभाग घेतला. आधी मी दारू आणि सिगारेट प्यायचो. मात्र, धावणे सुरू केले तेव्हापासून हे सगळे व्यसन सुटले. रनिंगमुळे माझी प्रकृतीही ठणठणीत राहू लागली. धावणे सुरू केल्यानंतर मी कधीच आजारी पडलो नाही. कधीच रुग्णालयात जाण्याची गरज पडली नाही. मी अातापर्यंत ८० वेळा रक्तदान केले आहे. इतकेच नव्हे तर माझे सिक्स पॅक अॅब्सही आहेत.’
आशिया, युरोप आणि अमेरिकेच्या जवळपास १३ देशांत मी धावलो आहे. यात म्यानमार, इंडोनेशिया, लाओस, व्हिएतनाम, चीन तैवान, हाँगकाँग, इटली, कॅनडा आदींचा समावेश आहे. मी आतापर्यंत रनिंग आणि मॅरेथॉनच्या स्पर्धेत जवळपास ५०० ट्रॉफीज जिंकल्या आहेत. मी खरे तर विजय-पराभवासाठी धावत नाही. फिट राहण्यासाठी धावतो, असेही प्रोम्पिनन म्हणतात.
माझ्या मुलीला माझी खूप काळजी वाटत असते. या वयात मी धावू नये, असे ती म्हणते. मात्र, मला बघा. मी पूर्णपणे फिट आहे. कसलेच आजारपण नाही. मला कोणतीही वस्तू धावण्यापासून रोखू शकत नाही. मला हे मनापासून आवडते. जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत मी धावणार. मला व्हर्टिकल रन रेस अधिक आकर्षित करते. कारण यात आव्हाने असतात.
बातम्या आणखी आहेत...