आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘खेलो इंडिया’अंतर्गत शहराला ८० कोटी! केंद्र शासनाची याेजना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - केंद्र शासनाने ‘खेलो इंडिया’अंतर्गत देशातील प्रत्येक शहरात विविध खेळांच्या क्रीडा सोयी-सुविधा देण्याचे ठरविले आहे. त्यात प्रामुख्याने अॅथलेटिक्स, हॉकी, फुटबॉल व जलतरण या खेळांचा समावेश केला आहे. तसेच विविध खेळांसाठी बहुउद्देशीय हॉलचाही यात समावेश आहे. जगात सर्वाधिक युवक असलेल्या भारतात लोकसंख्येच्या ३५ टक्के लोकसंख्या युवकांची आहे. त्यात १५ ते २९ वर्षे या वयोगटातील २७.५ टक्के युवक असल्याचे केंद्र शासनाचा क्रीडा खात्याचा सर्व्हे सांगतो. यातील टॅलेंट शोधण्यासाठी ‘खेलो इंडिया’ ही योजना तयार केली आहे. वार्षिक क्रीडा स्पर्धा घेणे, प्रतिभावंतांचा शोध, कार्यरत क्रीडा संस्थांना सुविधा,मार्गदर्शन व उत्तेजन देणे, शहर पातळीवर क्रीडा सुविधेचे मुख्य उद्दिष्टे आहेत.

ऑलिम्पिकमध्ये पदके मिळवायची असतील तर मूळ पाया भक्कम करणे गरजेचे आहे. त्यासाठी गावापासून विकास झाला तर देशाचा विकास शक्य आहे हे ओळखूनच केंद्र शासनाने ग्रामपंचायत स्तरापासूनच ३ कोटी रुपयांचे साहाय्य देण्याचे ठरले आहे. जिल्हास्तरावर ८० कोटी रुपयांपर्यंतचे अनुदान निश्चित झाले. त्यानुसार सर्व राज्य शासनामार्फत ही योजना कार्यान्वित करण्याच्या सूचना केंद्राने दिल्या अाहेत.

कुणाला लाभ?
केंद्र व राज्य शासनाच्या शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, राज्य शासन, महापालिका, क्रीडा नियंत्रण केंद्रे, राज्य क्रीडा परिषद व राज्य क्रीडा प्राधिकरण.

क्रीडा स्पर्धांनाही १०० टक्के अनुदान
क्रीडा सुविधांबरोबर या सत्रातील क्रीडा स्पर्धा घेण्याचेही केंद्र शासनाने ठरविले आहे. अन्य क्रीडा स्पर्धा रद्द करून २१ खेळांच्या स्पर्धा ब्लॉक, जिल्हा, राज्य व राष्ट्रीय पातळीवर घेण्याचेही निर्देश दिले. या स्पर्धा सबज्युनियर, ज्युनियर व वरिष्ठ गटात होणार आहेत. याचा शंभर टक्के खर्च ते करणार आहेत.

अनुदान किती?
खेळ रक्कम कोटीत
सिंथेटिक
अॅथलेटिक्स ट्रॅक ०७
सिंथेटिक हॉकी मैदान५.५०
सिंथेटिक टर्फ
फुटबॉल मैदान ०५
बहुउद्देशीय हॉल ०८
जलतरण तलाव ०५
जिल्हा क्रीडा संकुल ५०
ग्रामपंचायत व
तालुका स्तर ०३

२१ खेळ कोणते?
१. अॅथलेटिक्स २. जिम्नॅस्टिक ३. जलतरण ४. बॅडमिंटन ५. टेबल टेनिस ६. धनुर्विद्या ७. वुशू ८. तायक्वांदो ९. वेटलिप्टिंग १०. सायकलिंग ११. बॉक्सिंग १२. ज्युदो १३. कुस्ती १४. कबड्डी १५. खो-खो १६. हॉकी १७. फुटबॉल १८. व्हॉलीबॉल १९. बास्केटबॉल २०. हँडबॉल २१. टेनिस.
बातम्या आणखी आहेत...