आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामीण भागामध्ये प्राे कबड्डीचे अाठवडाभरात 9 काेटी चाहते!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- अायपीएलच्या धर्तीवर अायाेजित प्राे कबड्डी लीगने अल्पावधीमध्ये लाेकप्रियतेचे यशाेशिखर गाठले. पाचव्या सत्राच्या लीगला अातापर्यंत १३.२ काेटी चाहत्यांनी पसंती दर्शवली अाहे. त्यामुळे यंदाच्या लीगची अाठवडाभरातील चाहत्यांची संख्या काेटीच्या घरात जाऊन बसली. ग्रामीण भागामध्ये चाहत्याचा माेठा वर्ग असल्याचे समाेर अाले. याची संख्या तब्बल ९ काेटी अाहे.  त्यामानाने शहरी भागातील चाहत्यांचे प्रमाण नगण्य स्वरूपात अाहे. 

याची संख्या ४.२ काेटी अाहे. जुलैच्या शेवटच्या अाठवड्यात या स्पर्धेला सुरुवात झाली. सध्या ही पाचव्या सत्रातील प्राे कबड्डी लीग अाहे. देशभरातील अांध्र प्रदेश, महाराष्ट्र अाणि कर्नाटक राज्यामध्ये या कबड्डी लीगला माेठ्या संख्येत लाेकप्रियता मिळाली अाहे.  

गत चार वर्षांपूर्वी लीगच्या स्वरूपामध्ये प्राे कबड्डीला सुरुवात करण्यात अाली.  चार वर्षांतील यशस्वी अायाेजनाने या लीगला माेठी लाेकप्रियता मिळाली. त्यामुळे अायाेजकांनी एकाच सत्रात दाेन वेळा या लीगच्या अायाेजनाचा निर्णय घेतला.  

लाेकप्रियतेमुळे चार नवे संघ सहभागी
चार वर्षांच्या अल्पवाधीतील अायाेजनामुळे कबड्डीने माेठी लाेकप्रियता मिळवली. यातून या लीगच्या पाचव्या सत्रामध्ये नव्याने चार संघांनी सहभागी हाेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे गुजरात, तामिळनाडू, हरियाणा अाणि उत्तर प्रदेशच्या संघांनी सहभाग घेतला. त्यामुळे अाता यंदा कबड्डी लीगमधील सहभागी संघांची संख्या एकूण १२ झाली अाहे. यातून या संघांची दाेन गटात विभागणी करण्यात अाली.यात तीन महिने सामने हाेतील.

महाराष्ट्रातील ग्रामीण भाग अाघाडीवर
मराठमाेळ्या कबड्डीला महाराष्ट्रातूून चालना मिळाली अाहे. त्यामुळे यंदाच्या या लीगला महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील चाहत्यांनी माेठ्या संख्येत डाेक्यावर घेतले. त्यामुळे या लीगला अल्पावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये माेठी लाेकप्रियता मिळाली. त्यामुळे लाेकप्रियतेच्या क्रमवारीत महाराष्ट्र अाघाडीवर अाहे.   

जयपूर पिंक पँथर्स विजयी
सिनेअभिनेता अभिषेक बच्चनच्या जयपूर  पिंक पँथर्सने गुरुवारी लीगमध्ये शानदार विजय संपादन केला. जयपूरने सामन्यात अ गटातील अव्वल पुणेरी पलटनचा पराभव केला. जयपूरने ३०-२८ अशा फरकाने रंगतदार सामना जिंकला. यात पुणेरी पलटनचा विजयाचा प्रयत्न अपुरा ठरला.  

अाजपासून अहमदाबादमध्ये दम 
लीगमधील सामन्यांना शुक्रवारपासून अहमदाबादमध्ये सुरुवात हाेणार अाहे. त्यामुळे यजमान गुजरात जायंट्स टीमला अापल्या घरच्या मैदानावर सरस कामगिरी करण्याची संधी अाहे. त्यासाठी गुजरात टीम उत्सुक अाहे.  

तामिळचा बंगळुरूला धक्का  
तामिळ थलाइर्वाजने अटीतटीचा सामना जिंकला. या टीमने लढतीत यजमान बंगळुरू बुल्सला पराभवाचा धक्का दिला. तामिळने २९-२४ ने विजय संपादन केला. यजमानांचा दुसऱ्या विजयाचा प्रयत्न अपुरा ठरला.
बातम्या आणखी आहेत...