Home | Sports | Other Sports | 13 sports matches on the first day; 19 Gold Target; India will go to the ground for 17 medals

पहिल्या दिवशी 13 खेळांचे सामने; 19 सुवर्ण लक्ष्य; भारत 17 पदकांसाठी मैदानात उतरणार

दिव्‍य मराठी | Update - Apr 05, 2018, 08:14 AM IST

उद््घाटन सोहळा बुधवारी पार पडला. गुरुवारी राष्ट्रकुल स्पर्धा २०१८ च्या सामन्यांना सुरुवात होत आहे. पहिल्या दिवशी एकूण १३

 • 13 sports matches on the first day; 19 Gold Target; India will go to the ground for 17 medals

  गोल्ड कोस्ट- उद््घाटन सोहळा बुधवारी पार पडला. गुरुवारी राष्ट्रकुल स्पर्धा २०१८ च्या सामन्यांना सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी एकूण १३ क्रीडा प्रकारांत सामने होतील. यात ५ प्रकारांत सुवर्णपदकाचे लक्ष राहणार आहे. या पाच प्रकारांत सायकलिंग, जिम्नॅस्टिक, जलतरण, ट्रायथलॉन आणि वेटलिफ्टिंगचा समावेश आहे. या पाच प्रकारांत एकूण १७ सुवर्णपदकांसाठी खेळाडू भिडतील. भारताचा पहिला सामना बॅडमिंटनचा आहे. मिश्र सांघिक गटात श्रीलंकेविरुद्ध सामना होईल. भारतीय वेळेनुसार ५ एप्रिल रोजी सकाळी ४.३० वाजता लढतीला सुरुवात होईल. एकूण २२ क्रीडा प्रकारांत भारत आपले खेळाडू उतरवेल. भारतीय महिलांकडे इतिहास रचण्याची संधी आहे.

  १५०० पदके तयार, वजन १६३ ग्राम

  - स्पर्धेसाठी जवळपास १५०० पदके तयार करण्यात आली आहेत. सर्वांचा व्यास ६३ मिमी आणि वजन १३८ ते १६३ ग्रामदरम्यान आहे.
  - यंदा पहिल्यांदा स्पर्धेत महिला व पुरुषांचे क्रीडा प्रकार समान आहेत. १३३-१३३ प्रकार. ९ मिश्र प्रकार आहेत.
  - ४ नोव्हेंबर २०१७ एका चॅरिटी उपक्रमात पहिल्या गोल्डकोस्ट राष्ट्रकुलमध्ये देण्यात येणाऱ्या पदकाचे चित्र सार्वजनिक केले होते. या पदकाला ऑस्ट्रेलियनच्या डेलवनी कुकाटू-कोलिन्सने तयार केले.

  गोल्डकोस्ट अपडेट: १२ वर्षांचा दुष्काळ दूर करण्यास भारतीय महिला हाॅकी संघ सज्ज

  ऑस्ट्रेलिया रिंगमध्ये न उतरताच बॉक्सरने केले आपले पदक पक्के

  ऑस्ट्रेलियाची महिला बॉक्सर टेलाह रॉबर्टसनने स्पर्धेत आपल्या लढतीपूर्वीच पदक पक्के केले. रॉबर्टसनला महिलांच्या ५१ किलो वजन गटात बिना खेळता उपांत्य फेरीत प्रवेश मिळाला. त्यामुळे ती पदकासाठी पोडियमवर येईल. तिच्या वजन गटात केवळ ७ खेळाडू आहेत, पराभूत झालेल्या दोन जणांना कांस्यपदक मिळेल.

  भारतीय महिला हॉकी संघाचा पहिला सामना आज वेल्सविरुद्ध

  भारतीय महिला हॉकी संघ आज वेल्सविरुद्ध सामन्यात आपल्या अभियानास सुरुवात करेल. कर्णधार राणीच्या नेतृत्वाखाली टीम राष्ट्रकुल स्पर्धेत पदकाचा १२ वर्षांचा दुष्काळ दूर करण्याचा प्रयत्न करेल. भारतीय महिलांनी राष्ट्रकुल स्पर्धेत २००२ मध्ये सुवर्ण व २००६ मध्ये रौप्य जिंकले होते. अ गटात भारत, वेल्स, मलेशिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका संघ आहेत. भारताने सराव सामन्यात क्वीन्सलँडला ५-० ने हरवले, मात्र कॅनडाकडून त्यांना १-३ ने पराभव स्वीकारावा लागला. भारतीय संघाने बुधवारी पेनल्टी कॉर्नर वाचवण्यासह विरोधी संघावर आक्रमण करण्याच्या रणनीतीवर काम केले.

  बॉक्सरला मिळाले चांगले ड्रॉ, मेरी कोम पदकाच्या एक पाऊल दूर

  पाच वेळेची जागतिक विजेती मेरी कोम पदकापासून एक पाऊल दूर आहे. मेरी कोम पहिल्यांदा राष्ट्रकुल स्पर्धेत खेळणार असून तिला ८ एप्रिल रोजी आपल्या ४८ किलो वजन गटात क्वार्टरफायनलमध्ये स्कॉटलंडच्या मेगन गॉर्डनशी दोन हात करायचे आहेत. तिच्या गटात ८ खेळाडू आहेत. आपला पहिला सामना जिंकताच तिचे कमीत कमी कांस्यपदक पक्के होईल.

 • 13 sports matches on the first day; 19 Gold Target; India will go to the ground for 17 medals
  उद््घाटन सोहळ्यात अदाकारी दाखवताना ऑस्ट्रेलियन कलाकार.

Trending