Home | Sports | Other Sports | 2 More Gold medals in wresling to india in Commonwealth Games 2018

कॉमनवेल्थ गेम्स : रेसलर सुमित मलिक, विनेश फोगाटलाही सुवर्ण; साक्षीनेही जिंकले ब्राँझ

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 14, 2018, 03:19 PM IST

रेसलिंगमध्ये आतापर्यंत भारताने 12 पदकांची कमाई केली आहे. भारताच्या पथकातील सर्वच पहिलवानांनी पदकांची लयलूट केली.

 • 2 More Gold medals in wresling to india in Commonwealth Games 2018

  गोल्ड कोस्ट - कॉमनवेल्थ गेम्समध्ये शनिवारी रेसलर सुमित मलिकने 125 किलो आणि विनेश फोगाटने वुमन्स 50 किलो कॅटेगरीत भारताला गोल्ड मेडल मिळवून दिले. वुमन्स 62 किलोमध्ये साक्षी मलिक आणि मेन्स फ्रीस्टाइल 86 किलोमध्ये सोमवीर यांना ब्राँझ पदक मिळवण्यात यश आले. भारताने आतापर्यंत या स्पर्धेत 54 मेडल जिंकले आहेत. त्यापैकी 23 सुवर्ण पदकं आहेत. भारताने सर्वाधिक 16 पदकं शुटिंगमध्ये जिंकली आहेत. तर रेसलिंगमध्ये आतापर्यंत 12 पदकांची कमाई केली आहे.


  कोणी कोणते पदक जिंकले
  - मेन्स फ्रीस्टाइल 125 किलो (नॉर्डिक सिस्टीम) गटात सुमित मलिकने गोल्ड मेडल जिंकले
  - वुमन्स फ्रीस्टाइल 50 किलो (नॉर्डिक सिस्टम) गटात विनेश फोगाटने गोल्ड मेडल जिंकले
  - वुमेन्स फ्रीस्टाइल 62 किगलो (नॉर्डिक सिस्टम) गटात साक्षी मलिकने ब्राँझ पदकाची कमाई केली.
  - मेन्स फ्रीस्टाइल 86 किलो गटात सोमवीरने ब्राँझ जिंकले.

  देश गोल्ड सिलव्हर ब्राँझ एकूण
  ऑस्ट्रेलिया 70 53 56 179
  इंग्लंड 37 38 38 113
  भारत 23 13 18 54
  कॅनडा 14 39 26 79
  दक्षिण आफ्रिका 13 11 13

  37

  * ही गुणतालिका भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 2:00 वाजेपर्यंतची आहे.

 • 2 More Gold medals in wresling to india in Commonwealth Games 2018

Trending