आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Football:सेहवागने शेअर केला 'मेस्सी के चाचा'चा व्हिडिओ, म्हणाला- फ्रान्स, क्रोएशियाला विसरा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - जगभरात सध्या फुटबॉल फिव्हर पसरलेला आहे. वीरेंद्र सेहवागवरही सध्या हा फिव्हर असल्याचे दिसतेय. कारण आपल्या खास शैलीतील सोशल मीडियावरील पोस्टने लोकांचे मनोरंजन करणाऱ्या सेहवानगे एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत एक आजोबा फुटबॉलला किक मारताना दिसत आहेत. ही किक एवढी परफेक्ट आहे की, समोरच्या घराच्या अगदी लहानशा खिडकीतूनही हा बॉल बरोबर आत जात आहे. फिफा वर्ल्ड कपच्या पहिल्या सेमिफायनलनंतर सेहवागने हा व्हिडिओ शेअर केला आहे. याच्या कॅप्शनमध्ये सेहवागने लिहिले, 'फ्रान्स, इंग्लंड, क्रोएशिया' विसरा. या व्हिडिओसाठी त्याने हॅशटॅगमध्ये या आजोबांना #MessikeChacha मेस्सी के चाचा असे लिहिले. हा व्हिडिओ केव्हाचा किंवा कुठला आहे, याबाबत मात्र काहीही माहिती मिळालेली नाही. अर्जेंटीनाचा मेस्सी जगातील सर्वात प्रसिद्ध फुटबॉलर्सपैकी एक आहे. पण या आजोबांची किक पाहिल्यानंतर त्यांनी या आजोबांना थेट 'मेस्सी के चाचा' बनवले. 

 

 

बातम्या आणखी आहेत...