Home | Sports | Other Sports | commonwealth games 2018, india won silver in weightlifting

कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताचे खाते उघडले, गुरुराजा यांनी वेटलिफ्टिंगमध्ये पटकावले रौप्य

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 05, 2018, 08:42 AM IST

कॉमनवेल्थ केम्समध्ये पहिल्याच दिवशी भारताच्या खाताच्या खात्यात रौप्य पदक पडले आहे. वेटलिफ्टिंगमध्ये 56 किलो वजनी गटात गु

 • commonwealth games 2018, india won silver in weightlifting
  गुरुराजा 249 किलो वजन उचलून भारताला पहिल्या पदकाची कमाई करून दिली आहे.

  गोल्ड कोस्ट- कॉमनवेल्थ गेम्समध्ये पहिल्याच दिवशी भारताच्या खाताच्या खात्यात रौप्य पदक पडले आहे. वेटलिफ्टिंगमध्ये 56 किलो वजनी गटात गुरुराजा यांनी 249 किलो वजन उचलून भारताला पहिल्या पदकाची कमाई करून दिली आहे.


  आजपासून राष्ट्रकुल स्पर्धांना सुरूवात झाली आहे. सुरूवातीलाच पहिल्या दिवशी एकूण १३ क्रीडा प्रकारांत सामने खेळण्यात येणार आहे. यात ५ प्रकारांत सुवर्णपदकाचे लक्ष राहणार आहे. या पाच प्रकारांत सायकलिंग, जिम्नॅस्टिक, जलतरण, ट्रायथलॉन आणि वेटलिफ्टिंगचा समावेश आहे. या पाच प्रकारांत एकूण १७ सुवर्णपदकांसाठी खेळाडू भिडतील. भारताचा पहिला सामना बॅडमिंटनचा आहे. मिश्र सांघिक गटात श्रीलंकेविरुद्ध सामना होईल. भारतीय वेळेनुसार ५ एप्रिल रोजी सकाळी ४.३० वाजता लढतीला सुरुवात होईल. एकूण २२ क्रीडा प्रकारांत भारत आपले खेळाडू उतरवेल. भारतीय महिलांकडे इतिहास रचण्याची संधी आहे.


  भारतीय महिला हॉकी संघाचा पहिला सामना आज वेल्सविरुद्ध
  भारतीय महिला हॉकी संघ आज वेल्सविरुद्ध सामन्यात आपल्या अभियानास सुरुवात करेल. कर्णधार राणीच्या नेतृत्वाखाली टीम राष्ट्रकुल स्पर्धेत पदकाचा १२ वर्षांचा दुष्काळ दूर करण्याचा प्रयत्न करेल. भारतीय महिलांनी राष्ट्रकुल स्पर्धेत २००२ मध्ये सुवर्ण व २००६ मध्ये रौप्य जिंकले होते. अ गटात भारत, वेल्स, मलेशिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका संघ आहेत. भारताने सराव सामन्यात क्वीन्सलँडला ५-० ने हरवले, मात्र कॅनडाकडून त्यांना १-३ ने पराभव स्वीकारावा लागला. भारतीय संघाने बुधवारी पेनल्टी कॉर्नर वाचवण्यासह विरोधी संघावर आक्रमण करण्याच्या रणनीतीवर काम केले.


  बॉक्सरला मिळाले चांगले ड्रॉ, मेरी कोम पदकाच्या एक पाऊल दूर
  पाच वेळेची जागतिक विजेती मेरी कोम पदकापासून एक पाऊल दूर आहे. मेरी कोम पहिल्यांदा राष्ट्रकुल स्पर्धेत खेळणार असून तिला ८ एप्रिल रोजी आपल्या ४८ किलो वजन गटात क्वार्टरफायनलमध्ये स्कॉटलंडच्या मेगन गॉर्डनशी दोन हात करायचे आहेत. तिच्या गटात ८ खेळाडू आहेत. आपला पहिला सामना जिंकताच तिचे कमीत कमी कांस्यपदक पक्के होईल.

 • commonwealth games 2018, india won silver in weightlifting
  ९४ वर्षांत प्रथमच भारतीय महिला, पुरुष खेळाडू सारख्या पोशाखामध्ये

  ९४ वर्षांत प्रथमच भारतीय महिला, पुरुष खेळाडू सारख्या पोशाखामध्ये 


  ऑस्ट्रेलियाच्या गोल्डकोस्ट शहरात बुधवारी २१ व्या राष्ट्रकुल स्पर्धेचे उद््घाटन झाले. स्पर्धक देशांच्या संचलनात भारताचा चमू ३८ व्या स्थानी होता. ऑलिम्पिक रौप्यविजेत्या पी.व्ही. सिंधूने २१८ जणांच्या भारतीय चमूचे नेतृत्व केले. १९२४ च्या ऑलिम्पिकमध्ये प्रथमच भारतीय महिलांचा सहभाग होता. तेव्हापासून आजवर प्रथमच एखाद्या जागतिक क्रीडा स्पर्धेतच्या मार्च पास्टमध्ये भारतीय पुरुष व महिला खेळाडू एकसारख्या पोशाखात दिसले. भारतीय खेळाडू गडद नीळा ब्लेझर व ट्राऊझरमध्ये होते. 


  ड्रेस कोडमध्ये बदल का? 

  >ऑलिम्पिक व आशियाई स्पर्धा व राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय महिला खेळाडू साडी व ब्लेझरमध्ये संचलनात भाग घ्यायच्या. 
  > भारतीय ऑलिम्पिक संघटनेने २० फेब्रुवारीलाच याबाबतचा निर्णय घेतला हाेता. 
  > महिला खेळाडूंना सामान्यपणे साडीस सरावलेल्या नसतात. साडी नेसण्यासाठीही त्यांना इतरांची मदत घ्यावी लागते. उद््घाटन सोहळ्यादरम्यान त्यांना ५-७ तास साडी नेसून थांबावे लागते. 

 • commonwealth games 2018, india won silver in weightlifting
  पाच वेळेची जागतिक विजेती मेरी कोम पदकापासून एक पाऊल दूर आहे
 • commonwealth games 2018, india won silver in weightlifting
  १२ वर्षांचा दुष्काळ दूर करण्यास भारतीय महिला हाॅकी संघ सज्ज
 • commonwealth games 2018, india won silver in weightlifting
  वेटलिफ्टिंगमध्ये 56 किलो वजनी गटात गुरुराजा 249 किलो वजन उचलून भारताला पहिल्या पदकाची कमाई करून दिली आहे.

Trending