Home | Sports | Other Sports | Commonwealth Games 2018 Indian Shooter Om Mitharval Won Bronze

CWG : नेमबाजीत भारताला 3 पदके; बॉक्सिंग स्‍पर्धेत मेरी कोम फायनलमध्ये

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 12, 2018, 04:37 AM IST

भारताला जितू रायकडून सुवर्णपदकाची अपेक्षा होता. पण तो आठव्या स्थानावर राहिला.

 • Commonwealth Games 2018 Indian Shooter Om Mitharval Won Bronze

  कॉगोल्ड कोस्ट - राष्ट्रकुल स्पर्धेत नेमबाजांनी भारतासाठी आणखी ३ पदके जिंकली. श्रेयसी सिंगने महिलांच्या डबल ट्रॅप प्रकारात सुवर्ण जिंकले. ओम मिठरवालने ५० मीटर पिस्तूल आणि अंकुर मित्तलने डबल ट्रॅपमध्ये कांस्यपदक मिळवले. भारताने नेमबाजी आतापर्यंत ४ सुवर्णांसह १२ पदके आपल्या खात्यात जमा केली. जितू राय स्पर्धे बाहेर झाला. श्रेयसी सिंगने ४ वर्षांत पहिल्या ग्लास्गो राष्ट्रकुलमधील या प्रकारात रौप्यपदक जिंकले होते.

  अखेरच्या फेरीत ३ वरून ४ वर घसरली युवा नेमबाज वर्षा
  श्रेयसी सिंग महिलांच्या डबल ट्रॅप प्रकारात फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाच्या एमा कॉक्ससोबत ९६ गुणांवर बरोबरी केली. शूटऑफमध्ये श्रेयसीने बाजी मारत सुवर्ण जिंकले. स्कॉटलंडच्या लिंडा पियर्सनने कांस्यपदक मिळवले. दोघांचे एकूण गुण ९६ होते आणि निकाल शूटऑफमध्ये लागला. श्रेयसीची सहकारी नेमबाज वर्षा वर्मन चौथ्या स्थानी राहिली. वर्षाने २१, २५, २१, १९ असे गुण मिळवले, तर लिंडाने तिच्यापेक्षा अखेरच्या फेरीत उत्कृष्ट कामगिरी करत पोडियमवर जागा मिळवण्यात यशस्वी ठरली.

  पुढील स्‍लाइडवर वाचा, ओमने मिळवले पहिले पदक, जितू अपयशी तसेच मेरी कोम फायनलमध्ये...

 • Commonwealth Games 2018 Indian Shooter Om Mitharval Won Bronze

  ओमने मिळवले पहिले पदक, जितू अपयशी
  सातव्या दिवशी भारताला दिवसाचे पहिले पदक ओमने जिंकून दिले. ओमने ५० मीटर पिस्तूल प्रकारात २०१.१ गुणांसह कांस्यपदक जिंकले. ५४२ गुणांसह फायनलमध्ये पोहोचलेला जितू राय फायनलमध्ये आठव्या स्थानी राहिला. जितूने ग्लास्गो स्पर्धेत या क्रीडा प्रकारात
  सुवर्ण मिळवले होते. 

 • Commonwealth Games 2018 Indian Shooter Om Mitharval Won Bronze

  १० शॉटमध्ये ३ शॉट चुकले, कांस्य मिळाले  
  डबल ट्रॅपमध्ये अंकुर मित्तलने ५३ गुण मिळवले. तो फायनलमध्ये तिसऱ्या स्थानी राहिला. पहिल्या १० शॉटमध्ये अंकुरने सर्व नेम अचूक साधला. २० शॉट्सपर्यंत केवळ २ नेम चुकले होते. ५० शॉट्सनंतर त्याचे गुण ४६ झाले. अखेरच्या १० शॉटमध्ये ३ चुकले आणि कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

 • Commonwealth Games 2018 Indian Shooter Om Mitharval Won Bronze
  महिलांच्या ४५-४८ किलो गटात उपांत्य फेरीत श्रीलंकेच्या अनुशाला पंच मारताना भारताची स्टार बॉक्सर मेरी कोम.

  मेरी कोम फायनलमध्ये, गौरव-विकासचे पदक पक्के

  मेरी कोमने महिला बॉक्सिंगमध्ये ४५-४८ किलो वजन गटात फायनलमध्ये प्रवेश केला. पुरुष गटात गौरव सोळंकी आणि विकास कृष्णननेदेखील आपापले सामने जिंकत उपांत्य फेरीत प्रवेश केला. मेरी कोमने उपांत्य फेरीत श्रीलंकेच्या अनुषा दिलरूक्शी कोडिथुवाकूला ५-० ने मात दिली. पाच वेळेची जागतिक विजेती व आशियाई चॅम्पियन मेरी कोमचा   फायनलमध्ये आयर्लंडच्या क्रिस्टिना ओ हारा हिच्याशी सामना होईल. दुसरीकडे लेशराम सरितादेवीला ६० किलो वजन गटात क्वार्टर फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाच्या अंजा स्ट्राइडसमनकडून पराभव स्वीकारावा लागला. पुरुष गटात भारताचा गौरव व विकासने आपले पदक पक्के केले आहे. गौरवने ५२ किलो गटात आणि विकासने ७५ किलो गटात विजय मिळवला.   

   

 • Commonwealth Games 2018 Indian Shooter Om Mitharval Won Bronze
  मिथारवालने याआधी 10 मीटर एअर पिस्टलमध्ये कांस्यपदक मिळवले होते.
 • Commonwealth Games 2018 Indian Shooter Om Mitharval Won Bronze

Trending