Home | Sports | Other Sports | Commonwealth Games Day 11 Last Day Badminton, News And Updates

राष्ट्रकुल : भारताची तिसरी सर्वाेत्तम कामगिरी, 26 सुवर्णांसह 66 पदके

दिव्‍य मराठी वेब टीम | Update - Apr 16, 2018, 01:03 AM IST

माजी नंबर वन बॅडमिंटनपटू सायना नेहवाल रविवारी २१ व्या राष्ट्रकुल स्पर्धेत दुसऱ्यांदा चॅम्पियन ठरली. तिने एकेरीमध्ये सुव

 • Commonwealth Games Day 11 Last Day Badminton, News And Updates

  गाेल्ड काेस्ट- माजी नंबर वन बॅडमिंटनपटू सायना नेहवाल रविवारी २१ व्या राष्ट्रकुल स्पर्धेत दुसऱ्यांदा चॅम्पियन ठरली. तिने एकेरीमध्ये सुवर्णपदक पटकावले. त्यापाठाेपाठ पी.व्ही. सिंधू अाणि नंबर वन के.श्रीकांतने बॅडमिंटनमध्ये प्रत्येकी एका राैप्यपदकाची कमाई केली. बॅडमिंटनपटू चिराग अाणि सात्त्विकने भारताला एेतिहासिक राैप्यपदक मिळवून दिले. यासह भारताने शेवटच्या दिवशी एकूण ७ पदके जिंकली. यामध्ये सायनाच्या एका सुवर्णासह चार राैप्य अाणि दाेन कांस्यपदकांचा समावेश अाहे. या चमकदार कामगिरीसह भारतीय संघाने शेवटच्या दिवशी दबदबा कायम ठेवला. मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेचा समाराेप साेहळा रंगला. २२ वी राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ मध्ये बर्मिंगहॅम येथे हाेईल.


  यंदाच्या या स्पर्धेत भारतीय संघाची कामगिरी काैतुकास्पद ठरली. भारताने २६ सुवर्णांसह एकूण ६६ पदकांची कमाई करताना अापले तिसरे स्थान कायम ठेवले. अातापर्यंतची भारतीय संघाची ही तिसरी सर्वाेत्तम कामगिरी ठरली. यापूर्वी भारताने २०१० मध्ये १०१ अाणि २००२ मध्ये ६९ पदके जिंकली हाेती. यंदा २१८ सदस्यीय खेळाडूंसह भारतीय संघ राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी झाला हाेता. भारताने १६ खेळ प्रकारात चमकदार कामगिरी करताना पदके जिंकली. विदेशी प्रशिक्षकांच्या तंत्रशुद्ध प्रशिक्षणातून भारताच्या कामगिरीचा दर्जा उंचावला.

  बॅडमिंटन : पहिल्यांदा २ सुवर्णांसह ६ पदकांची भारताने केली कमाई

  ५६ मिनिटांत सायना विजेती; फायनलमध्ये सिंधूवर मात
  सायना नेहवालने ५६ मिनिटांत महिला एकेरीत सुवर्णपदकाची कमाई केली. तिने फायनलमध्ये सिंधूचा पराभव केला. तिने २१-१८, २३-२१ ने एकतर्फी विजय संपादन केला. यासह सायनाने दुसऱ्यांदा या स्पर्धेत चॅम्पियन हाेण्याचा बहुमान पटकावला. यापूर्वी, तिने २०१० मध्ये दिल्ली राष्ट्रकुल स्पर्धेत महिला एकेरीत सुवर्णपदक जिंकले हाेते. पराभवाने सिंधूला राैप्यपदकावर समाधान मानावे लागले.

  श्रीकांतला पहिले पदक; एकेरीत जिंकले राैप्यपदक
  जगातील नंबर वन श्रीकांतने करिअरमध्ये प्रथमच राष्ट्रकुलचे पदक जिंकले. त्याने रविवारी पुरुष एकेरीमध्ये राैप्यपदक पटकावले. त्याला फायनलमध्ये चार वेळच्या राष्ट्रकुल चॅम्पियन ली चाेंग वेईने पराभूत केले. लीने १९-२१, २१-१४, २१-१४ ने सामना जिंकला. श्रीकांतचे हे या स्पर्धेतील पहिलेच पदक ठरले. यापूर्वी, २०१४ मध्ये ग्लासगाे येथे त्याने एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली हाेती.

  दुहेरीत पहिल्यांदा पदक; चिराग-सात्त्विकला राैप्य
  चिराग अाणि सात्त्विक राजने भारतीय संघाकडून बॅडमिंटनमध्ये एेतिहासिक यश संपादन केले. या जाेडीने पुरुष दुहेरीत राैप्यपदक पटकावले. भारतीय संघाचे राष्ट्रकुल स्पर्धेतील दुहेरीतील हे पहिलेच पदक ठरले. चिराग अाणि सात्त्विकला फायनलमध्ये पराभवाला सामाेरे जावे लागले. इंग्लंडच्या मार्कस एलिस अाणि क्रिसने ३८ मिनिटांत भारताच्या जाेडीचा २१-१३, २१-१६ ने पराभव केला.

  स्क्वॅश : दीपिका-जाेश्नाला दुहेरीत २२ मिनिटांत राैप्य
  भारताच्या अनुभवी खेळाडू दीपिका पल्लिकलचा सुवर्णपदकाचा प्रयत्न अपयशी ठरला. त्यामुळे तिला महिला दुहेरीच्या फायनलमध्ये जाेश्ना चिनप्पासाेबत पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे भारताची ही जाेडी राैप्यपदकाची मानकरी ठरली. न्यूझीलंडच्या जाेएले किंग-अमांडा मर्फीने अंतिम सामन्यात भारताच्या जाेडीवर २२ मिनिटांत ११-९, ११-८ अशा फरकाने मात केली. यासह न्यूझीलंडच्या जाेडीने सुवर्णपदक पटकावले.

  > टेटे. : प्रथमच भारताला ८ पदके, मनिका यशस्वी

  मणिका बत्राला दुसरे पदक; मिश्र दुहेरीत जिंकले कांस्य

  महिला एकेरीमधील चॅम्पियन टेबल टेनिसपटू मणिका बत्राने दबदबा कायम ठेवताना दुहेरीतही पदकाची कमाई केली. तिने मिश्र दुहेरीत साथियनसाेबत कांस्य पटकावले. या जाेडीने कांस्यपदकाच्या लढतीत अापल्याच देशाच्या अंचत शरथ कमल अाणि माैमा दासला ३-० ने पराभूत केले. यासह भारताची मणिका अाणि साथीयन कांस्यपदकाचे मानकरी ठरले.

  शरथ कमलला कांस्य; इंग्लंडच्या सॅम्युअलवर मात

  भारताच्या अनुभवी टेबल टेनिसपटू अंचत शरथ कमलने पुरुष एकेरीमध्ये कांस्यपदक पटकावले. त्याने तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या सामन्यात इंग्लंडच्या सॅम्युअल वाॅकरला ४-१ ने पराभूत केले. त्याने ११-७, ११-९, ९-११, ११-९ अशा फरकाने सामना जिंकला. यासह त्याने दुसरे पदक पटकावले. यापूर्वी, त्याने पुरुष दुहेरीत राैप्यपदक जिंकले.

  भारतीय संघाचे एकूण ५०० पेक्षा अधिक पदके
  भारतीय संघ यंदा राष्ट्रकुल स्पर्धेत अाेव्हरअाॅल ५०० पदके पूर्ण करण्यामध्ये यशस्वी ठरला. त्यामुळे भारताच्या नावे एका विशिष्ट कामगिरीची नाेंद झाली. या स्पर्धेत ५०० पदके जिंकणाऱ्या संघांच्या यादीत भारताने पाचव्या स्थानावर धडक मारली. भारताच्या नावे अाता एकूण ५०४ पदके झाली. यामध्ये १८१ सुवर्ण, १७५ राैप्य अाणि १४८ कांस्यपदकांचा समावेश अाहे.

  पदक तालिका: टॉप 5 देश

  देश सुवर्ण रौप्‍य कास्‍य एकूण
  ऑस्‍ट्रेलिया 78 57 59 194
  इंग्‍लंड 43 43 44 129
  भारत 26 19 20 65
  कॅनडा 15 39 27 81
  न्‍यूझीलंड 13 15 16 44

  पुढील स्‍लाइडवर पाहा, फोटो...

 • Commonwealth Games Day 11 Last Day Badminton, News And Updates
 • Commonwealth Games Day 11 Last Day Badminton, News And Updates
  सायनाने गोल्‍ड कोस्‍टमध्‍ये मिक्‍स्‍ड टीम इव्‍हेंटचेही सुवर्णपदक जिंकले आहे.
 • Commonwealth Games Day 11 Last Day Badminton, News And Updates

  सायनाकडून पराभूत झाल्‍याने पी.व्‍ही. सिंधूला वुमेन्‍स सिंगल्‍समध्‍ये रौप्‍यपदकावर समाधान मानावे लागले.  

 • Commonwealth Games Day 11 Last Day Badminton, News And Updates

Trending