राष्ट्रकुल स्पर्धा; 150 कोटी प्रेक्षक पाहतील 3 तास 15 मिनिटे चालणारा उद््घाटन सोहळा
ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट शहरात बुधवारपासून २१ व्या राष्ट्रकूल स्पर्धेला प्रारंभ होत आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी २.३०
-
गोल्ड कोस्ट- ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट शहरात बुधवारपासून २१ व्या राष्ट्रकूल स्पर्धेला प्रारंभ होत आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी २.३० वाजता उदघाटन सोहळा सुरू होईल. तीन तास १५ मिनिटांपर्यंत केरारा स्टेडियमवर हा कार्यक्रम चालेल. यात विविध सांस्कृतिक कार्यक्रम असतील. विविध देशांच्या संचालनात भारतीय चमू ३८ व्या क्रमांकावर येईल. रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणारी पी.व्ही. सिंधू भारताकडून ध्वजवाहक असेल. २०१४ मध्ये राष्ट्रकूल स्पर्धा आयोजित करणारा स्कॉटलंडचा संघ परेडमध्ये सर्वात आधी येईल. शेवटच्या म्हणजेच ७१ व्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा संघ येईल.
- 53 देशांचे ७१ संघ गोल्ड कोस्टमध्ये होत असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत घेत आहेत सहभाग.
- 6600 खेळाडू या स्पर्धेत पदकांसाठी झुंजतील. स्पर्धा १२ दिवसांपर्यंत चालणार आहे.
- 06 लाख ७२ हजार प्रेक्षक गोल्ड कोस्ट शहराला भेट देतील. तसेच १५ हजार स्वयंसेवकही देतील योगदान.
- 101 पदके जिंकली होती भारताने २०१० मध्ये. परदेशात भारताने २००२ मध्ये ६९ पदके जिंकली होती.परदेशात भारताचा आजवरचा मोठा चमू
या स्पर्धेत भारताचे २१८ खेळाडू १५ क्रीडा प्रकारात सहभागी होणार आहेत. परदेशात आयोजित राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी होणारा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा संघ आहे. २०१४ मध्ये ग्लासगोत झालेल्या स्पर्धेत भारताचे २१५ खेळाडू सहभागी झाले होते
-