आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉमनवेल्थ : माजी नंबर वन हिना सिद्धूने जिंकले सुवर्णपदक; सचिनला कांस्यपदक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोल्ड कोस्ट - जगातील माजी नंबर वन नेमबाज हिना सिद्धू मंगळवारी २१ व्या राष्ट्रकुल स्पर्धेत चॅम्पियन ठरली. तिने महिलांच्या २५ मीटर पिस्तूल प्रकारामध्ये सुवर्णपदकाची कमाई केली. यासह तिने भारतीय संघाला दुसरे पदक मिळवून दिले. तिने नुकतेच १० मीटर एअर पिस्तूल प्रकारामध्ये राैप्यपदक पटकावले. अाता भारताने सहाव्यांदा राष्ट्रकुल स्पर्धेत १० पेक्षा अधिक सुवर्णपदकाची कमाई केली अाहे. त्यापाठाेपाठ सचिने चाैधरीने पॅरा वेटलिफ्टिंगमध्ये कांस्यपदक पटकवले. भारत २१ पदकांसह पदकातालिकेत तिसऱ्या स्थानावर कायम अाहे.  


दुसरीकडे भारताच्या अमित अाणि नमनने बाॅक्सिंगमधील भारताची पदके निश्चित केली अाहेत. त्यापाठाेपाठ हाॅकीमध्ये भारतीय पुरुष संघाने उपांत्य फेरीत धडक मारली. भारताने अंतिम अाठमध्ये मलेशियावर मात केली. याशिवाय स्क्वॅशमध्ये साैरवने अापली सहकारी दीपिका पल्लीकलसाेबत मिश्र गटात विजय संपादन केला. याशिवाय बॅडमिंटनच्या मिश्र गटात भारताच्या सात्त्विकराजने अश्विनीसाेबत दमदार सुरुवात केली. या जाेडीने गटात विजयी सलामी दिली.  भारताची सिंधू महिला एकेरीमध्ये वैयक्तिक साेनेरी यशाला गवसणी घालण्यासाठी सज्ज अाहे.


हिमाकडून पदकाची अाशा : अनसच्या अपयशानंतर हिमाकडून महिलांच्या गटातील ४०० मी. रेसमध्ये पदकाची अाशा अाहे. तिने गटाच्या फायनलमध्ये प्रवेश केला. तिने उपांत्य फेरीत ५१.५३ सेकंदाची वेळ नाेंदवली.

 

विक्रमी गुणांसह हिनाचा सुवर्ण वेध
भारताच्या २८ वर्षीय अनुभवी नेमबाज हिनाने अापल्या २५ मीटर पिस्तूल प्रकारामध्ये विक्रमी गुणांची कमाई केली. तिने पात्रता फेरीमध्ये सरस कामगिरी केली. यामुळे तिला अंतिम फेरी गाठता अाली. तिने फायनलमध्ये विक्रमी ३८ गुण संपादन केले. यासह तिने सुवर्णपदकाची मानकरी ठरली. दरम्यान तिने अाॅस्ट्रेलियाच्या एलिनाला मागे टाकत तीन गुणांच्या अाघाडीने अव्वल स्थान गाठले. त्यामुळे अाॅस्ट्रेलियाच्या एलिनाला ३५ पदकांसह राैप्यपदकावर समाधान मानावे लागले.

 

पॅरा वेटलिफ्टिंगमध्ये भारताला एक पदक
भारताच्या सचिन चाैधरीने मंगळवारी वेटलिफ्टिंगमध्ये सरस कामगिरी करताना संघाचा पदकाचा दबदबा कायम ठेवला. पॅरा वेटलिफ्टर सचिनने अापल्या गटात कांस्यपदक पटकावले. त्याने फायनलमध्ये १८१ गुण संपादन केले.यासह ताे तिसऱ्या स्थानावर राहिला. भारताचे या गटातील या स्पर्धेतील हे पहिले पदक ठरले. या गटात नायजेरियाचा इब्राहिम चॅम्पियन ठरला. त्याने १९१.९ गुणांसह सुवर्णपदक पटकावले. 

 

बाॅक्सिंग : अमित, नमन उपांत्य फेरीत
भारताचे अाघाडीचे बाॅक्सर अमित पंघाल अाणि नमनने स्पर्धेतील अापली पदके निश्चित केली. त्यांनी अापापल्या गटाच्या उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केला. यासह त्यांची पदके निश्चित झाली. अमितने पुरुषांच्या लाइट फ्लाइटवेट ४९ किलाे वजन गटाच्या अंतिम चारमध्ये धडक मारली. त्याने अंतिम अाठमध्ये स्काॅटलंडच्या अकिल अहमदचा पराभव केला. त्याने ४-१ ने एकतर्फी विजयाची नाेंद केली. अाता त्याचा सामना युगांडाच्या जुमा मीराेशी शुुक्रवारी हाेईल. नमनने ९१ किलाे वजन गटाच्या उपांत्य फेरी गाठली. त्याने अंतिम अाठमध्ये समाेअाच्या फ्रॅक मसाेएला धूळ चारली. त्याने ५-० अशा फरकाने एकहाती विजय संपादन केला. 

 

पुढील स्‍लाइडवर वाचा, अधिक माहिती...

बातम्या आणखी आहेत...