आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रकुल स्पर्धेत चौथ्या दिवशी महिलांनी भारताला मिळवून दिले तीन सुवर्ण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मनू भाकर - Divya Marathi
मनू भाकर

गोल्ड कोस्ट- भारतीय शूटर मनू भाकरने १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक पटकावून विक्रम प्रस्थापित केला. राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी १६ वर्षीय मनु सर्वात कमी वयाची शूटर ठरली, तर १० मीटर एअर पिस्तूलमध्ये सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय शूटर आहे. वेटलिफ्टिंगमध्ये पूनम यादवने ६९ किलो वजन गटात एकूण २२२ किलो वजन उचलून सुवर्णपदक जिंकले, तर मनिका बत्राने टेबल टेनिसमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. मनिकाच्या नेतृत्वाखाली टेबल टेनिस संघाने सिंगापूरला ३-१ अशा फरकाने पराभूत केले.

 

मनू भाकर- शूटिंगमध्ये १६ वर्षीय मनू भाकरला सुवर्णपदक

- सर्वात कमी वयात पदक मिळवणारी पहिली भारतीय.

- १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात मिळवणे सुवर्णपदक

- गेल्या ३५ दिवसांत मनूचे हे सहावे सुवर्णपदक आहे.

- यापूर्वी तिने ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये ३, तर सीनियर स्पर्धेत २ सुवर्णपदक पटकावले.


पुढील स्‍लाइडवर पाहा,पूनम यादव आणि मनिका बत्रा... 

बातम्या आणखी आहेत...