आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉमनवेल्थ गेम्स : नो नीडल पॉलिसीनुसार 2 भारतीय खेळाडू दोषी, भारतात परतण्याचे आदेश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

- खोलीत नीडल आढळल्याने दोन्ही खेळाडू समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत. 

- भारतीय अॅथलेटिक्स महासंघाच्या सचिवांच्या मते, राकेश आणि इरफान यांनी ते निर्दोष असल्याचा दावा केला आहे. 


गोल्ड कोस्ट - कॉमनवेल्थ गेम्समध्ये नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन भारतीय अॅथलिट्सना भारतात परत पाठवण्यात आले आहे. सीडब्ल्यूजी फेडरेशनचे अद्यक्ष लुइस मार्टिन यांनी सांगितले की, धावपटू केटी इरफान आणि ट्रिपल जंपर व्ही राकेश बाबूला गेम्ससाठी अपात्र ठरवले आहे. इव्हेंटच्या मधूनच त्यांना भारतात परतण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दुसरीकडे अॅथलेटिक्स महासंघाने हा प्रकार लज्जास्पद असून चौकशीनंतर कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे. 


समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत खेळाडू 
इरफान आणि राकेशवर 'नो नीडल पॉलिसी'चे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. गेम्स व्हिलेजमध्ये दोघांच्या खोलीतून नीडल्स मिळाल्या होत्या. त्याबाबत संबंधित अथॉरिटीसमोर त्यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही. फेडरेशन कोर्टाने दोन्ही अॅथलिट्सचे उत्तर संशयास्पद असल्याचे म्हटले, त्यांच्यावर परतण्याची कारवाई करण्यात आली. 


काय आहे नियम?
नियमांनुसार अॅथलिट्सना सीरिंजचा वापर करण्याची परवानहगी नाही. काही कारणास्तव त्यांना वापर करावाच लागला तरी आधी त्यांना मेडिकल कमिशनला सांगावे लागते. किंवा त्याचा वापर करण्याच्या 24 तासांपूर्वी माहिती द्यावी लागते. 


भारतातही होणार कारवाई 
- दोन्ही खेळाडुंवर भारतीय अॅथलेटिक्स महासंघाकडूनही कारवाई केली जाणार आहे. फेडरेशनचे सचिव सीके वाल्सन यांनी म्हटले आहे की, ही लज्जास्पद घटना आहे. कॉमनवेल्थ गेम्सनंतर या प्रकरणी लवकरच कारवाई केली जाईल असे ते म्हणाले.


खेळाडुंचे म्हणणे काय 
वॉल्सन यांच्या मते, दोन्ही खेळाडुंनी ते निर्दोष असल्याचे म्हटले आहे. त्यांचे म्हणणे आहे की, रवाना होताना लगेज तपासले नसल्यामुळे बॅगमध्ये नीडल राहिली. कॉमनवेल्थ गेम्सदरम्यान या नीडल दिसल्याने त्या खोलीत ठेवल्या. कारण नीडल फेकण्याची परवानगी नव्हती. पण खेळाडुंना नियमांची माहिती आधीच दिली होती. तसेच नो नीडल पॉलिसीशिवाय खेळाडुंच्या इतर टेस्ट क्लिअर असल्याचेही ते म्हणाले. 

 

बातम्या आणखी आहेत...