आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता IPL 11 मध्येही लागू होईल DRS, आंतरराष्ट्रीय T20 मध्ये पूर्वीपासूनच होता नियम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - इंडियन प्रिमियर लीग (आयपीएल) च्या 11व्या पर्वात म्हणजे यंदापासून DRS लागू केला जाणार आहे. आयपीएलचे चेअरमन राजीव शुक्ला यांनी या बाबीला दुजोरा दिला. त्यामुळे आता आयपीएलमध्येही संघांना अंपायरच्या निर्णयाला आव्हान देता येईल. टी20 इंटरनॅशनल मॅचेसमध्ये डीआरएस पूर्वीपासूनच लागू आहे. आयपीएलच्या इतिहासात यंदा प्रथमच ओपनिंग सेरेमनीला सर्व कर्णधार उपस्थित नसतील. महेंद्रसिंह धोनी (चेन्नई सुपरकिंग्स) आणि रोहित शर्मा (मुबंई इंडियन्स) या दोघांचीच उपस्थिती असेल. यापूर्वी स्पिरिट ऑफ क्रिकेटची शपथ घेण्यासाठी ओपनिंग सेरेमनीमध्ये सर्व कर्णधारांची उपस्थिती असायची. ओपनिंग सेरेमनी 7 एप्रिलला मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये होईल. ओपनिंग सेरेमनीनंतर चेन्नई आणि मुंबईत सामना होईल.  


काय आहे डीआरएस.. 
- ही तीन तंत्रज्ञानापासून तयार झालेली प्रक्रिया आहे. त्याद्वारे थंड अंपायर फलंदाज आऊट आहे की नाही, हे ठरवतात. 
- हॉक-आय : ही व्हर्च्युअल बॉल ट्रॅकिंग टेक्निक आहे. त्याचा वापर एलबीडब्ल्यूमध्ये होतो. त्याद्वारे चेंडू पॅडवर लागल्यानंतर विकेटवर लागणार की नाही हे लक्षात येते. 
- स्निकोमीटर : याद्वारे मायक्रोफोनद्वारे हे समजते की, चेंडू बॅटला लागला आहे किंवा नाही?  
- हॉट-स्पॉट : यात फलंदाजाचा फोटो काळा होतो. आणि चेंडू लागला असेल तो भाग पांढरा दिसतो. 
- त्यानंतरही थर्ड अंपायरचे समाधान झाले नाही तर तो मैदानावरील अंपायरचा निर्णय अंतिम ठेवतो. 


ओपनिंग सेरेमनीला फक्त 2 कर्णधार 
- आयपीएल-11 च्या ओपनिंग सेरेमनीच्या दुसऱ्या दिवशी दोन मॅच आहेत. त्यामुळे 6 कर्णधारांना ओपनिंग सेरेमनीला न बोलावण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. 
- बीसीसीआयने सांगितले की, यापूर्वी ओपनिंग सेरेमनीनंतर दुसऱ्या दिवशी त्याच मैदानावर मॅच असायची. पण यावेळी ओपनिंग सेरेमनीच्या दिवशीच पहिली मॅच असेल. दुसऱ्या दिवशी दोन मॅच असल्याने चार कर्णधारांना मुंबईहून मोहाली आणि कोलकात्याला जायला उशीर होईल. त्यामुळे हा निर्णय घेतला आहे.