आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 महिन्यांपूर्वी अपघात, दाेन्ही पाय कापावे लागले;पुन्हा एफ वनच्या ट्रॅकवर उतरण्याच्या तयारीत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- हे छायाचित्र इंग्लंडच्या १८ वर्षीय रेसर बिली माेंगरचे अाहेे. त्याला गतवर्षी एप्रिल महिन्यात फाॅर्म्युला-४ च्या दरम्यान माेठा अपघात झाला. या भीषण अपघातामुळे त्याचे दाेन्ही पाय कापावे लागले. मात्र, त्याने पराभव पत्कराला नाही. त्याने कार पूर्णपणे माॅडिफाय केली अाणि पुन्हा रेसिंगच्या ट्रॅकवर परतला. त्याचे पुनरागमन लक्षवेधी ठरले.

 

अपघात तुम्हाला राेखू शकत नाही 

 

एप्रिल २०१७ मध्ये डाॅनिंगटन रेसच्या दरम्यान माझ्या कारची स्पीड २२५ किमी/प्रतितास अशी हाेती.  माझ्या कारला भीषण अपघात झाला. यामुळे मी चार-पाच दिवस काेमात हाेताे. यातून मी सुखरूपपणे बाहेर अालाे. मात्र, त्या वेळी मी माझे दाेन्ही पाय गमावून बसलाे हाेताे. त्यामुळे पाय गमावण्याचे झालेले माेठे दु:ख मला शब्दातही कथन करता येत नाही. काही दिवसांपर्यंत मी व्हीलचेअरवर हाेताे. मात्र, कुटुंबीय अाणि मित्र परिवारांच्या मानसिक पाठबळामुळे मी हे सारे काही विसरलाे अाणि नव्याने उभारी घेतली. त्यासाठी मी पुन्हा ट्रॅकवर परतण्याचा निर्णय घेतला,अशा शब्दांत त्याने अापला संघर्षमय प्रवास कथन केला.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, बिली माेंगर- इन्सेट ब्रिटिश रेसर हॅमिल्टनसाेबत....

 

बातम्या आणखी आहेत...