आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रीय स्तरावर अाता दरवर्षी रंगणार ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ खाे-खाे स्पर्धा; जानेवारीत अायाेजन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अाैरंगाबाद- अांतरराष्ट्रीय स्तरावर खाे-खाेला वेगळी अाेळख मिळवून देण्यासाठी अाता केेंद्रीय क्रीडा मंत्रालय  अाणि भारतीय खाे-खाे महासंघाने पुढाकार घेण्यासाठी ठाेस अशी पावले उचलली अाहेत. यासाठीच्या माेहिमेला पुढच्या वर्षापासून सुरुवात हाेत अाहे. यातून अाता लवकरच ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ राष्ट्रीय खाे-खाे स्पर्धेचे अायाेजन करण्याचा निर्णय घेण्यात अाला. ही स्पर्धा जानेवारीच्या शेवटच्या अाठवड्यात अायाेजित केली जाईल. यामध्ये देशभरातील एकूण ३२ संघ सहभागी हाेतील. यात महिला व पुरुषांच्या प्रत्येकी १६ टीमचा समावेश असेल. स्पर्धेच्या सामन्यांसाठी अाठ शहराची निवड केली जाईल. या स्पर्धेचा फायनल मुकाबला दिल्लीत  हाेईल.  लवकरच या स्पर्धेची अधिकृत घाेषणा केली जाणार अाहे.  


खेळाडूंना प्रत्येकी ५ लाख

या स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंवर लाखाे रुपयांच्या बक्षिसांचा वर्षाव हाेेईल. यासाठी विजेत्या व उपविजेत्या संघातील प्रत्येक खेळाडूला ५ लाखांचे बक्षीस देण्यात येईल. तसेच इतर वैयक्तिक बक्षिसेही पुरवण्यात येतील, अशी माहितीही फेडरेशनच्या वतीने देण्यात अाली. सहभागी संघातील युवांनाही खास पारिताेषिके देण्यात येतील.   


स्पर्धेवर अडीच काेटींचा खर्च

केेंद्रीय क्रीडा मंत्रालय  अाणि राष्ट्रीय खाे-खाे फेडरेशनच्या संयुक्त विद्यमाने देशभरात ही स्पर्धा अायाेजित केली जाणार अाहे. यासाठी  २.५ काेटी रुपयांची खास अार्थिक तरतूद करण्यात अाली. 

 

महाराष्ट्रातही सामने 
या खाे-खाे स्पर्धेतील सामन्यांचे अायाेजन महाराष्ट्रातही हाेणार अाहे. यासाठी लवकरच मैदानाची घाेषणा केली जाईल. सध्या पुणे, मुंबईसह मराठवाड्यातील अाैरंगाबाद अाणि उस्मानाबादच्या नावाची चर्चा अाहे. या ठिकाणी खाे-खाेसाठीची वातावरणनिर्मिती पाेषक अाहे. 

 

युराेपात खाे-खाेला  अाेळख देणार : त्यागी
युराेपात खाे-खाेला नवीन अाेळख मिळवून देण्याचा दबदबा निर्माण करण्याचे अामचे टार्गेट अाहे. या साठी अाम्ही प्रयत्नशील अाहाेत. त्या दिशेने अामची वाटचाल अाहे.  यातून  निश्चितच याेग्य प्रकारे यश संपादन करता येईल. २० देशांमध्ये खाे-खाे या खेळाला चालना मिळवून दिली, अशी प्रतिक्रिया महासचिव महिंद्रसिंग त्यागी यांनी ‘दिव्य मराठी’शी बाेलताना दिली.

बातम्या आणखी आहेत...