आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅच आयोजकांवर फॅन्स भडकले; मैदानावर भिरकावले हजारो चेंडू, टॉयलेट रोल्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फ्रँकफर्ट - जर्मन फुटबॉल लीग बुंदेसलीगा येथे नुकतेच एनट्रॅच फ्रँकफर्ट आणि आरबी लिपजिग यांच्यात सामना झाला. फ्रँकफर्ट येथे सोमवारी हा मॅच आयोजित झाल्याने फॅन्स भडकले. त्यांनी मैदानावर याचा कळाडून विरोध केला. तरीही आयोजकांनी त्यांचे काहीच ऐकूण घेतले नाही. यानंतर सोमवारी मॅच सुरू होणार तेवढ्यात शेकडो फॅन्सने मैदानावर हजारो टेनिस बॉल भिरकावले. तसेच टॉयलेट रोल्स फेकून आपला रोष व्यक्त केला. 

 

- फॅन्सपैकी एका सांगितल्याप्रमाणे, फुटबॉल क्लब काही युरो कमवण्यासाठी कुठलाही सामना कुठल्याही दिवशी ठेवण्यास तयार आहेत. त्यांना फक्त पैसा हवाय.
- सुट्टी नसताना लोक कार्यालयात जातीलल की मॅच पाहायला मैदानावर येतील अशा जाब चाहत्यांनी विचारला. 
- आयोजकांनी मात्र, सलग फुटबॉल सामने होत असल्याने खेळाडूंना आराम मिळावा यासाठी सोमवारी आयोजन केल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.
- दर्शक भडकणार याची क्लबला पूर्वकल्पना होती. त्यामुळेच त्यांनी सुरक्षा रक्षकांना भडकलेल्या फॅन्सला शांततेने हाताळा असे आदेश दिले होते. 
- या गोंधळामुळे फर्स्ट हाफ अर्धा तास उशीराने सुरू झाला. तर दुसरा हाफ सुरू होण्यासही 15 मिनिटांचा वेळ गेला. यात फ्रँकफर्टने 2-1 ने सामना जिंकला. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, मैदानावर झालेल्या नाराज समर्थकांच्या गोंधळाचे फोटो...

बातम्या आणखी आहेत...