आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Fifa WC : फ्रान्स दुसऱ्यांदा जगज्जेता! 20 वर्षांनंतर केली इतिहासाची पुनरावृत्ती, क्रोएशियाचा 4-2 ने पराभव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माॅस्को- १९९८चा जेता फ्रान्सने २० वर्षांनंतर दुसऱ्यांदा फिफा वर्ल्डकप जिंकला. क्रोएिशयाविरुद्ध फ्रान्सने रविवारी ४-२ असा विजय मिळवला. फ्रान्सकडून एंटोनी ग्रीजमॅन, पॉल पोग्बा, किलियन एम्बापे यांनी गोल केले. क्रोएशियाच्या मारियो मांजुकिचच्या ओनगोलचाही फ्रान्सला लाभ झाला. प्रथमच अंतिम फेरीत दाखल क्रोएिशयाकडून पेरिसिच व मांजुकिच यांनी गोल केले. १९६६ नंतरचा अंतिम फेरीतील हा सर्वात मोठा विजय ठरला. तेव्हा इंग्लंडने प. जर्मनीला ४-२ने हरवले होते. ब्राझीलने १९५८ मध्ये स्वीडनला ५-२ने पराभूत करून याहीपेक्षा मोठा विजय नोंदवलेला आहे.

 

अशी चढली सामन्यात रंगत..

सामन्यातील पहिला गोल 

सामन्याती पहिला गोल फ्रान्सच्या नावावर झाला. पण हा गोल क्रोएशियाच्या मांजुकिचने केलेला आत्मघातकी गोल होता. 

 

दुसरा गोल, क्रोएशियाचे पुनरागमन

फ्रान्सने 1-0 ने आघाडी घेतल्यानंतर क्रोएशियानेही आक्रमक खेळ केला. त्याचा परिणाम म्हणजे 28 मिनिटाला इव्हान पेरिसिकने गोल करत क्रोएशियाला बरोबरी मिळवून दिली. 

 

तिसरा गोल, फ्रान्सची पुन्हा आघाडी

38 मिनिटाला क्रोएशियाच्या पेरिसिकच्या हँड बॉलमुळे फ्रान्सला पेनाल्टी कीक मिळाली. अँटोनी ग्रीझमनने या संधीचे सोने करत फ्रान्सला पुन्हा एकदा 2-1 ने आघाडी मिळवून दिली. 

 

चौथा गोल - फ्रान्सने आघाडी मजबूत केली

क्रोएशियाने फ्रान्सला रोखून धरत चांगला खेळ सुरू केला होता. पण 59 व्या मिनिटाचा पॉल पोग्बाने एक सुंदर गोल करत आघाडी अधिक मजबूत केली आणि क्रोएशियाच्या अडचणी अधिक वाढवल्या. 

 

पाचवा गोल - एम्बापेचा आणखी एक गोल

फ्रान्सचे चौथ्या गोलचे सेलिब्रेशन सुरू असतानाच या वर्ल्डकपमध्ये हिरो बनून समोर आलेल्या एम्बापेने फ्रान्ससाठी चौथा गोल केला.   

 

सहावा गोल - फ्रान्सकडून क्रोएशियाला गिफ्ट

फ्रान्सने मोठी आघाडी घेतल्यानंतर क्रोएशियावर प्रेशर आणून सामना जिंकायची संधी असतानाच फ्रान्सच्या गोलकिपरनेच क्रोएशियावरील दबाव कमी केला. त्याने दिलेल्या संधीमुळे क्रोएशियाच्या मांझुकिचने गोल करत क्रोएशियाच्या आशा जीवंत ठेवल्या. 

 

यानंतर फ्रान्सने क्रोएशियाला परत सामन्यात पुनरागमन करण्याची संधी दिली नाही, आणि विजेतेपदावर नाव कोरले. 

 

स्पर्धेतील एकूण बक्षिसांची किंमत ५४१८ काेटी रुपये
> चॅम्पियन फ्रान्स 256 काेटी
> उपविजेता क्रोएशिया 189 काेटी
> तिसरा बेल्जियम 162 काेटी


- १४२ काेटी रुपयांचे बक्षीस मिळाले चाैथ्या क्रमांंकावरील इंग्लंडला. 
- १०८ काेटी रुपये बक्षीस मिळाले क्वार्टर फायनलमधील विजेत्यांना (४ टीम)
- ८१ काेटी रुपये बक्षीस मिळाले प्रत्येक प्री क्वार्टर फायनलमधील विजेत्यांना (एकूण ८ टीम). 
- ५४ काेटी रुपयांचे बक्षीस ग्रुप स्टेजमधून बाहेर राहणाऱ्या संघांना. (एकूण १६ टीम)


सर्वाधिक १६ गाेल बेल्जियमच्या नावे
- बेल्जियमने ७ सामन्यांत १६ गोल केले. ६ गोल गमावले.
- क्रोएशिया व इंग्लंडने प्रत्येकी १२ गाेल केले
- रशियाने ११ गाेल केले, तर फ्रान्सने १० गाेल केले.
- क्रोएशियाच्या इवान राकिटिचने चालू सत्रात ७१ वा सामना खेळला. या सत्रात सर्वाधिक सामने खेळण्याचा मान या खेळाडूला मिळाला.

या कारणांसाठी आठवणीत राहील २०१८ चा वर्ल्डकप


>व्हीएआर ९९.२% यशस्वी
व्हिडिया असिस्टंट रेफरीचा वर्ल्डकपमध्ये प्रथमच वापर केला. स्पर्धेत ४४० वेळा याला वापरण्यात आले. याच्या मदतीने ९५ ते ९९.२ टक्क्यांपर्यंत अचूक निर्णय दिला गेला. वर्ल्डकपमध्ये प्रथमच एकही ऑफसाइड गोल झाला नाही. ६२ सामन्यांत १९ निर्णयांचे रिव्ह्यू घेतले. १६ निर्णय बदलण्यात आले.


> मक्तेदारी संपुष्टात आली
८८ वर्षे जुन्या फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदा क्रोएशिया सारख्या देशाने फायनलमध्ये जागा पक्की केली. तर रशिया प्रथमच उपांत्य सामन्यात पोहोचला. २८ वर्षांनी इंग्लंडनेही उपांत्य सामन्यात जागा निश्चित केली. याचाच अर्थ निवडक देशांची मक्तेदारी संपुष्टात आली आहे.


> ‘फेअर प्ले’चा झाला फायदा
आतापर्यंत फेअर प्लेचा अर्थ एक ट्राॅफी व सन्मान इतकाच होता. या वर्ल्डकपमध्ये प्रथमच उत्तम फेअर प्लेच्या आधारे जपानसारख्या संघाला बाद फेरीत जाता आले. ग्रुपमध्ये जपान आणि सेनेगलचे गुण, गोलचे अंतर सारखे होते. पण सेनेगलला जास्त यलो कार्ड (६) मिळाल्याने त्यांना स्पर्धेतून बाहेर पडावे लागले.


> रशियाच्या नेतृत्वात स्पर्धेचे यशस्वी आयोजन
वर्ल्डकपआधी रशियात स्पर्धा आयोजनासंबंधी प्रश्न उपस्थित झाले. स्टेडियममध्ये ९८% पर्यंत प्रेक्षक होते. इंग्लंडच्या काही खासदारांनी युरोपियन युनियनच्या नेत्यांना सोबत घेत बहिष्कारासाठी दबाव वाढवला, आयएसने हल्ल्याची धमकी दिली. पण स्पर्धेचे यशस्वी आयोजन झाले.


> पुढील वर्ल्डकप कतारमध्ये, प्रथमच नोव्हें-डिसेंबरमध्ये स्पर्धा
पुढील वर्ल्डकप २०२२ मध्ये कतार येथे होईल. पहिल्यांदाच अरब देशात स्पर्धा होईल. कतारमधील वाढीव तापमानाची अनेक देशांना काळजी आहे. त्यामुळे फिफाने २१ नोव्हेंबर ते १८ डिसेंबरदरम्यान स्पर्धा घेण्याचे ठरवले. १९३० नंतर पहिल्यांदा जून-जुलैमध्ये स्पर्धा खेळवली जात नाही. आशियात दुसऱ्यांदा वर्ल्डकप होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...