Home | Sports | Other Sports | Goal of Superstar KEISuke Honda

हाेंडाचा निर्णायक गाेल, जपानने सेनेगलला बराेबरीत राेखले

वृत्तसंस्था | Update - Jun 25, 2018, 07:32 AM IST

सुपरस्टार केइसुके हाेंडाच्या निर्णायक गाेलने जपान संघाचा रविवारी विश्वचषक फुटबाॅल स्पर्धेतील पराभव टाळला. या गाेलच्या ब

 • Goal of Superstar KEISuke Honda

  एकेतेरिनबर्ग- सुपरस्टार केइसुके हाेंडाच्या निर्णायक गाेलने जपान संघाचा रविवारी विश्वचषक फुटबाॅल स्पर्धेतील पराभव टाळला. या गाेलच्या बळावर जपानने एच गटातील दुसऱ्या सामन्यात सेनेगल संघाला बराेबरीत राेखले. अटीतटीत रंगलेला हा सामना २-२ ने बराेबरीत राहिला. इनुई (३४ वा मि.) अाणि केईसुके हाेंडा (७८ वा मि.) यांनी प्रत्येकी एक गाेल करून जपानचा सामना बराेबरीत ठेवला. तसेच सेनेगल संघाकडून माने (११ वा मि. ) अाणि वेगुई (७१ वा मि.) यांनी प्रत्येकी एक गाेल केला. यासह दाेन्ही संघांना प्रत्येकी एका गुणावर समाधान मानावे लागले. अाता जपानचा संघ ४ गुणांसह गटात अव्वल स्थानावर अाहे.


  या दाेन्ही संघांना नाॅकअाऊटमधील प्रवेशासाठी गटातील तिसरा सामना जिंकावा लागेल. या सामन्यातील विजयाने या दाेन्ही संघांचा पुढच्या फेरीतील प्रवेश निश्चित हाेईल.


  जागतिक क्रमवारीत २७ व्या स्थानावर असलेल्या सेनेगलने सामन्यात दमदार सुरुवात करताना सहज मजबूत पकड घेतली. यातून या संघाने अवघ्या ११ व्या मिनिटाला १-० ने अाघाडी मिळवली हाेती.


  १९ वर्षीय वेगुईचा अांतरराष्ट्रीय गाेल
  सेनेगलच्या १९ वर्षीय मुसा वेगुईने सामन्यात उल्लेखनीय कामगिरी करताना सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याने ७१ व्या मिनिटाला सुपर किक मारून अचूक असा गाेल केला. त्याचा करिअरमधील हा पहिला अांतरराष्ट्रीय गाेल ठरला. त्याने वर्ल्डकपमध्ये दमदार पदार्पण केले.


  सेनेगलविरुद्ध सामन्यात गाेलरक्षकाला हुलकावणी देत गाेल करताना जपानचा केईसुके हाेंडा. त्याच्या गाेलमुळे सामना बराेबरीत राहिला.

Trending