आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॅरी केनची हॅट‌्ट्रिक, स्टाेन्सचे दाेन गाेल; इंग्लंड विक्रमी विजयाने नाॅकअाऊटमध्ये

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाेवाेगाेराेड- जागतिक क्रमवारीत १२ व्या स्थानावर असलेल्या इंग्लंडने विक्रमी विजयासह फिफाच्या २१ व्या विश्वचषक फुटबाॅल  स्पर्धेच्या नाॅकअाऊटमधील प्रवेश निश्चित केला. इंग्लंडने जी गटातील अापल्या दुसऱ्या सामन्यात रविवारी पनामाचा पराभव केला. इंग्लंडने ६-१  अशा फरकाने सामना जिंकला. या टीमचा स्पर्धेतील हा सलग दुसरा विजय ठरला. यासह इंग्लंड ६ गुणांच्या अाधारे अव्वलस्थानी अाहे.  


कर्णधार हॅरी केन (२२, ३६, ४५+१ वा मि.) अाणि स्टाेन्स (८,४० वा मि.) यांनी सुरेख गाेल करून इंग्लंडला माेठ्या फरकाने विजय मिळवून दिला. तसेच लिंगार्डने (३६ वा मि.) संघाच्या विजयात एका गाेलचे महत्त्वाचे याेगदान दिले. त्यामुळे इंग्लंडला एकतर्फी विजयाची नाेंद करता अाली. पनामाकडून बालाेयने (७८ वा मि.) सामन्यात गाेल केला.


पनामाचा पहिला गाेल
बालाेयने पनामाकडून एेतिहासिक गाेल केला. या गाेलमुळे पनामाला वर्ल्डकपमध्ये पहिल्या गाेलची नाेंद करता अाली. प्रथमच हा संघ विश्वचषकासाठी पात्र ठरला अाहे. 


यंदा पहिल्या हॅट‌्ट्रिकची नाेंद
इंग्लंडच्या कर्णधार हॅरी केनच्या अव्वल कामगिरीमुळे यंदाच्या विश्वचषकात पहिल्या हॅट‌्ट्रिक गाेलची नाेंद झाली. त्याने पनामाविरुद्ध सामन्यात हा पराक्रम गाजवला. त्याने सामन्यात २२, ३६ अाणि ४५+३ व्या मिनिटाला गाेल केला.  यासह त्याने सामन्यात हॅट‌्ट्रिक नाेंदवली. अशा प्रकारे यंदा पहिली हॅट‌्ट्रिक नाेंदवणारा हॅरी केन हा पहिला खेळाडू ठरला अाहे. 

 

राेनाल्डाेला टाकले मागे 
इंग्लंड संघाच्या कर्णधार हॅरी केनने यंदाच्या विश्वचषकात सलग दुसऱ्या सामन्यातील विजयात माेलाचे याेगदान दिले. त्याने रविवारी दुसऱ्या सामन्यात पनामाविरुद्ध गाेलची हॅट‌्ट्रिक नाेंदवली. यासह त्याने पाेर्तुगालच्या क्रिस्टियानाे राेनाल्डाे अाणि बेल्जियमच्या राेमेलू लुकाकूला मागे टाकले. अाता केनच्या नावे यंदाच्या स्पर्धेत सर्वाधिक ५ गाेल झाले अाहेत. त्याने दाेन सामन्यांत हा पल्ला गाठला. राेनाल्डाे अाणि लुकाकूच्या नावे दाेन सामन्यांत प्रत्येकी ४ गाेल अाहेत. 

बातम्या आणखी आहेत...