Home | Sports | Other Sports | Hockey Match draw between ​India Vs Pakistan In Gold Coast CWG

CWG : अखेरच्या 7 सेकंदांत पाकने हिसकावला भारताच्या हातून विजय, 2-2 ने मॅच ड्रॉ

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 07, 2018, 01:36 PM IST

कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारत आणि पाकिस्तान यांनी आता पर्यंत प्रत्येकी एक-एक विजय मिळवलेला आहे.

 • Hockey Match draw between ​India Vs Pakistan In Gold Coast CWG

  गोल्ड कोस्ट - कॉमनवेल्थ गेम्समध्ये शनिवारी पाकिस्तानने हॉकी सामन्यात अखेरच्या सात सेकंदांमध्ये भारताच्या हातून विजय खेचून नेला. पेनल्टी कॉर्नर घेत पाकिस्तानने अखेरच्या क्षणी गोल केला आणि मॅच 2-2 अशा स्कोअरवर ड्रॉ झाली.


  त्याआधी भारताने पाकिस्तानवर 2-1 ने आघाडी घेतली होती. मॅचच्या पहिल्या क्वार्टरमध्ये दिलप्रीत सिंहने पहिला गोल केला. त्यानंतर सुमारे 7 मिनिटांनी दुसरा गोल हरमनप्रीत सिंहने केला. पूल बीमध्ये भारताचा हा पहिला सामना होता.


  UPDATES
  - सुरुवातीपासूनच दोन्ही टीम अत्यंत आक्रमक असल्याचे पाहायला मिळाले.
  - भारताकडून दिलप्रित सिंहने 12:43 व्या मिनिटाला गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली.
  - भारताचा पहिला पेनाल्टी कॉर्नर पहिल्या क्वार्टरच्या 19:15 मिनिटांनी मिळाला. पण हरमनप्रितला त्यावेळी गोल करण्यात अपयश आले.
  - 19:41 मिनिटांनी पुन्हा भारताला पेनाल्टी कॉर्नर मिळाला, त्यावेळी मात्र हरमनप्रित सिंहने काहीही चूक केली नाही.
  - पहिल्या क्वॉर्टरचा खेळ संपेपर्यंत भारताने 2-0 ने आघाडी घेतली होती.
  - दुसऱ्या क्वॉर्टरमध्ये पाकिस्तानला सलग दोन पेनाल्टी कॉर्नर मिळाले. पण त्यांच्या टीमला गोल करण्यात यश आले नाही.
  - पण 38:30 मिनिटांनी पाकच्या मोहम्मद इरफान ज्युनियरने गोल केला.
  - त्यानंतर मॅच संपायला अवघे काही क्षण असताना पाकला पेनाल्टी कॉर्नर मिळाला आणि दुसरा गोल करत त्यांनी मॅच बरोबरीत संपवली.

 • Hockey Match draw between ​India Vs Pakistan In Gold Coast CWG

Trending