Home | Sports | Other Sports | ICC ODI rankings: England tops after five years, India second place

ICC वन डे क्रमवारी: इंग्लंड पाच वर्षांनी नंबर वन; भारत दुसऱ्या स्थानी

वृत्तसंस्था | Update - May 03, 2018, 02:15 AM IST

भारतीय क्रिकेट टीम आयसीसी वनडे क्रमवारीत पहिल्यावरून दुसऱ्या स्थानी घसरली. त्यांच्या क्रमवारीच्या वार्षिक गुणांकनात ३ ग

 • ICC ODI rankings: England tops after five years, India second place

  कोलकाता - भारतीय क्रिकेट टीम आयसीसी वनडे क्रमवारीत पहिल्यावरून दुसऱ्या स्थानी घसरली. त्यांच्या क्रमवारीच्या वार्षिक गुणांकनात ३ गुणांचे नुकसान झाले. इंग्लंडला ८ गुणांचा फायदा झाला असून त्याने तिसऱ्या स्थानावरून पहिले स्थान गाठले. इंग्लंडचा (१२५ गुण) संघ २०१३ नंतर पहिल्यांदाच नंबर वन बनला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेने बुधवारी ताजी क्रमवारी जाहीर केली.

  इंग्लंडने २०१५ - १६ दरम्यान ६३ पैकी ४१ सामने जिंकले आहेत. त्यांनी सहा वनडे मालिका जिंकल्या आहेत. भारतीय क्रिकेट संघाने १२५ गुणांसह दुसरे स्थान गाठले. दक्षिण आफ्रिका ४ गुणांच्या नुकसानीसह तिसऱ्या स्थानी घसरला. टी-२० मध्ये भारत तिसऱ्या स्थानी आहे.


  प्रत्येक वर्षी १ मे रोजी नवीन क्रमवारी : वार्षिक नवीन क्रमवारीमध्ये जवळपास ३ वर्षांच्या आकड्यांचा समावेश असतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद त्याला प्रत्येकी वर्षी १ मे रोजी जाहीर करते. त्यासह क्रमवारीतील एक वर्ष जुन्या आकड्यांना बाजूला केले जाते. सध्याच्या ताज्या क्रमवारीत २०१४-१५ च्या सत्रातील आकडे काढून टाकण्यात आले आहेत.

  क्रमवारी (अव्वल ५)
  इंग्लंड १२५, भारत १२३, द.आफ्रिका ११३, न्यूझीलंड ११२, ऑस्ट्रेलिया १०४.


  टी २० क्रमवारी (अव्वल ५)
  पाकिस्तान १३०, ऑस्ट्रेलिया १२६, भारत १२३, न्यूझीलंड ११६, इंग्लंड ११५.

Trending