Home | Sports | Other Sports | India beat malaysia 3-1 wins gold medal in mixed team badminton CWG 2018

CWG: जितूने घेतला सुवर्णवेध; भारतीय संघाचे टेबल टेनिस, बॅडमिंटनमध्ये साेनेरी यश!

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 10, 2018, 05:44 AM IST

भारताने बॅडमिंटनच्या मिक्स्ड टीम इव्हेंटमध्ये गोल्ड मेडल जिंकला आहे. फायनल सामन्यात भारताने मलेशियाला 3-1 ने पराभूत केले

 • India beat malaysia 3-1 wins gold medal in mixed team badminton CWG 2018

  गाेल्डकाेस्ट - भारतीय संघाने अापली उल्लेखनीय कामगिरी कायम ठेवताना पाचव्या दिवशीही २१ व्या राष्ट्रकुल स्पधॅेतील अापली साेनेरी यशाची लय राखून ठेवली. यातून भारतीय संघाने साेमवारी पाच पदकांची कमाई केली. यात दाेन सुवर्णांसह एक राैप्य अाणि दाेन कांस्यपदकाचा समावेश अाहे. वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील राैप्यपदक विजेत्या जितू राॅयने नेमबाजीमध्ये सुवर्णपदकाचा वेध घेतला. त्यापाठाेपाठ के. श्रीकांत अाणि सिंधूच्या नेतृत्वात भारतीय बॅडमिंटन संघाने मिश्र गटात सुवर्णपदक पटकावले. त्यानंतर अंचता कमल शरथच्या नेतृत्वाखाली पुरुष संघाने टेबल टेनिसमध्ये सुवर्णपदक पटकावले.

  १२ वर्षानंतर प्रथमच भारताला या खेळाच्या पुरुष गटातही सुवर्णपदकाची कमाई करता अाली. याशिवाय नेमबाजीमधील पदकाची लय कायम ठेवताना मेहुलीने राैप्य अाणि अपूर्वी चंदेलाने अापापल्या गटात अनुक्रमे राैप्य अाणि कांस्यपदके पटकावली. त्यापाठाेपाठ अाेम मिथरवाल कांस्यपदकाचा मानकरी ठरला. तसेच वेटलिफ्टिंगमधील भारतीय खेळाडूंचा दबदबा पाचव्या दिवशीही कायम राहिला. प्रदीप सिंगने पुरुषांच्या १०५ किलाे वजन गटात राैप्यची कमाई केली. महिला गटात भारताची पाेर्णिमा पांडे अाठव्या स्थानावर राहिली. तिचा पदक जिंकण्याचा प्रयत्न अपुरा ठरला.

  जितू ठरला अव्वल; सर्वाधिक २३४.१ गुणांची कमाई
  अाॅलिम्पियन नेमबाज जितू राॅयने पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारामध्ये सुवर्णपदकाचा वेध घेतला. त्याने अापल्या गटाच्या फायनलमध्ये सर्वाधिक २३४.१ गुणांची कमाई केली. त्यामुळे त्याला अव्वल स्थान गाठता अाले. त्याने यादरम्यान पहिल्या फेरीत १००.४ गुणांसह अाघाडी घेतली. त्यानंता त्याने दुसऱ्या फेरीत १०.३ अाणि १०.३ ची चांगली कामगिरी केली. त्यामुळे त्याला अाॅस्ट्रेलिच्या कॅरी बेलला मागे टाकून सुवर्णपदक अापल्या नावे करता अाले.

  १२ वर्षांनंतर भारतीय पुरुष टे.टे. संघ विजेता
  अनुभवी खेळाडू अंचता शरथ कमलच्या नेतृत्वाखाली भारताच्या पुरुष संघाने टेबल टेनिस प्रकारात एेतिहासिक साेनेरी यश संपादन केले. टीमने १२ वर्षानंतर पहिल्यांदा या गटात सुवर्णपदक पटकावले. भारताने फायनलमध्ये नायजेरियाच्या पराभव केला. भारताने ३-० ने एकतर्फी विजय संपादन केला. यामध्ये अंचता शरथ कमलसह हरमीत देसाई अाणि जी. साथियानचे माेलाचे याेगदान राहिले. यापूर्वी, मनिका बत्राच्या नेतृत्वाखाली भारतीय महिलांनीही यामध्ये सुवर्णपदक पटकावले.

  पुढील स्‍लाइडवर पाहा, इतर माहिती व फोटो...

 • India beat malaysia 3-1 wins gold medal in mixed team badminton CWG 2018

  प्रथमच मिश्र गटात बॅडमिंटन टीमला सुवर्ण; श्रीकांत-सायना ठरले सरस

  भारतीय बॅडमिंटन संघाने प्रथमच राष्ट्रकुल स्पर्धेच्या मिश्र गटात सुवर्णपदक पटकावले. भारताने या गटाच्या फायनलमध्ये गत चॅम्पियन मलेशियाचा पराभव केला. श्रीकांत अाणि सायनाच्या सरस कामगिरीच्या बळावर भारताने ३-१ अशा फरकाने फायनल मुकाबला जिंकला. यासह भारताला पहिल्यांदा किताबाची नाेंद अापल्या नावे करता अाली. पराभवामुळे दाेन वेळच्या राष्ट्रकुल चॅम्पियन मलेशियाला यंदा राैप्यपदकावर समाधान मानावे लागले. सायनाने फायनलमध्ये मलेशियाच्या साेनियावर २१-११, १९-२१, २१-९ ने मात केली.

 • India beat malaysia 3-1 wins gold medal in mixed team badminton CWG 2018

  एका गटात २ पदके; मेहुली, अपूर्वीचे यश
  महिलांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात भारताने दाेन पदकांची कमाई केली. यात मेहुली दासच्या राैप्य अाणि अपुर्वी चंदेलाच्या कांस्यपदकाचा समावेश अाहे. त्यांनी एकाच गटात भारताला दाेन पदके मिळवून दिले.

 • India beat malaysia 3-1 wins gold medal in mixed team badminton CWG 2018

  एकूण ३५२ किलाे वजनासह प्रदीप दुसऱ्या स्थानावर
  भारताच्या वेटलिफ्टर प्रदीप सिंगने पुरुषांच्या १०५ किलाे वजन गटात अव्वल कामगिरी केली. त्याने एकूण ३५२ किलाे वजनासह दुसऱ्या स्थानावर धडक मारली. त्याने स्नॅचमध्ये १५२ अाणि त्यानंतर क्लीन अँड जर्कमध्ये २०० किलाे वजनाचा भार उचलला. यासह ताे राैप्यपदकाचा मानकरी ठरला. या गटात समाेअाच्या सैनेले माअाेने ३६० किलाेसह सुवर्णपदकाची कमाई केली. तसेच इंग्लंडच्या अाेवेनला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.  

 • India beat malaysia 3-1 wins gold medal in mixed team badminton CWG 2018

  विक्रमासह अाेमने जिंकले कांस्यपदक
  भारताच्या युवा नेमबाज अाेम मिथरवालने पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तूलमध्ये कांस्यपदक पटकावले. त्याने या ठिकाणी ५८४ गुणांच्या क्वालिफाइंग विक्रमाची नाेंद केली. त्यानंतर त्याने सरस कामगिरीच्या बळावर अंतिम फेरी गाठली. यासह त्याने २१४.३ गुणांसह तिसरे स्थान गाठले.

 • India beat malaysia 3-1 wins gold medal in mixed team badminton CWG 2018
 • India beat malaysia 3-1 wins gold medal in mixed team badminton CWG 2018
 • India beat malaysia 3-1 wins gold medal in mixed team badminton CWG 2018

Trending