Home | Sports | Other Sports | India's goal of completing 500 medals at the Comeback Medal, Countdown at Tap-4!

भारताचे टाॅप-4 मध्ये कमबॅकचे, अाॅल टाइम मेडल काउंटमध्ये 500 पदक पुर्णचे लक्ष्य!

वृत्तसंस्था | Update - Apr 04, 2018, 02:00 AM IST

क्रीडाविश्वातील सर्वात माेठ्या तिसऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेला बुधवारपासून अाॅस्ट्रेलियातील गाेल्डकाेस्ट येथे सुरुवात हाेणा

 • India's goal of completing 500 medals at the Comeback Medal, Countdown at Tap-4!

  गाेल्डकाेस्ट- क्रीडाविश्वातील सर्वात माेठ्या तिसऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेला बुधवारपासून अाॅस्ट्रेलियातील गाेल्डकाेस्ट येथे सुरुवात हाेणार अाहे. या २१ व्या राष्ट्रकुल स्पर्धेचा उद््घाटन साेहळा पहिल्या दिवशी रंगणार अाहे. सांस्कृतिक कार्यक्रमाने या उद््घाटन साेहळ्याला रंगत चढणार अाहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी गुरुवारपासून स्पर्धेला सुरुवात हाेईल. यजमान अाॅस्ट्रेलियासह या स्पर्धेत ५३ देशांचे संघ सहभागी झाले अाहेत. यामध्ये भारतीय संघावर सर्वांची खास नजर असेल.


  भारताचे २१८ सदस्यीय पथक यंदाच्या या गाेल्डकाेस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत अापले काैशल्य पणास लावणार अाहे.यंदाच्या स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरीच्या बळावर पदकतालिकेच्या टाॅप-४ मध्ये स्थान मिळवण्याच्या इराद्याने भारतीय संघ मैदानावर उतरणार अाहे. याशिवाय अाॅल टाइम मेडलमध्ये पदकांच्या ५०० च्या अाकड्याला गवसणी घालण्याचे भारतीय संघाचे माेठे लक्ष्य अाहे. याची मदार युवा खेळाडूंवर असेल. यंदाची ही राष्ट्रकुल स्पर्धा भारतीय संघासाठी महत्त्वाची मानली जाते. कारण २०१० मध्ये भारताने अापल्या घरच्या मैदानावर राष्ट्रकुल स्पर्धेत १०१ पदकांची कमाई केली हाेती. त्यानंतर २०१४ मध्ये भारताला ६५ पदके जिंकता अाली. त्यामुळे भारताचा संघ १६ वर्षांनंतर टाॅप-४ मधून बाहेर पडला. स्काॅटलंड येथे अायाेजित करण्यात अालेल्या स्पर्धेत भारताचा संघ चाैथ्या स्थानावर हाेता.


  अाता अाॅस्ट्रेलियातील स्पर्धेदरम्यान भारतीय संघाला यजमानांसह इंग्लंड, कॅनडा संघाच्या अाव्हानाला सामाेरे जावे लागेल. तसेच यादरम्यान भारतीय संघ स्काॅटलंडच्या टीमला मागे टाकण्यासाठी उत्सुक अाहे. भारताला या स्पर्धेमध्ये तगडे अाव्हान देण्यासाठी कॅनडाचा संघही सज्ज झालेला अाहे.

  ५०० पदके पूर्ण करण्याची संधी; अातापर्यंत ४३८ पदके
  भारतीय संघाला अाता अाॅल टाइम मेडलच्या पदकतालिकेत अापल्या नावे ५०० पदके पूर्ण करण्याची संधी अाहे. यासाठी भारताला यंदाच्या स्पर्धेत ६२ पदकांची गरज अाहे. यातून भारताला पदकांचा ५०० चा अाकडा सहजपणे गाठता येईल. अातापर्यंत १६ वेळा राष्ट्रकुल स्पर्धेत सहभाग नाेंदवताना एकूण ४३८ पदके जिंकली अाहेत. त्यामुळे अव्वल कामगिरी करताना हे अाकडा पार करण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल.

  चार वर्षांपूर्वी या खेळात राहिला हाेता दबदबा
  भारतीय संघाचा मागील चार वर्षांत कुस्तीसह नेमबाजी, बॅडमिंटनसारख्या काही खेळांमध्ये अापला दबदबा निर्माण करता अाला. त्यामुळे भारताने कुस्तीमध्ये पाच सुवर्णांसह एकूण १३ पदके जिंकली हाेती. नेमबाजीमध्ये चार सुवर्णांसह १७ पदके जिंकली. वेटलिफ्टिंगमध्ये ३ सुवर्णांसह १४ पदके, बॅडमिंटनमध्ये १ सुवर्णासह चार पदके, अॅथलेटिक्समध्ये एका सुवर्णासह तीन पदके, स्क्वॅशमध्ये एक पदक जिंकले.

  भारतीय हाॅकी संघासमाेर अाेल्टमसचे तगडे अाव्हान
  भारतीय पुरुष हाॅकी संघाला स्पर्धेत सर्वात माेठे अाव्हान माजी परफार्मेन्स निर्देशक अाेल्टमस यांचे असेल. कारण, अाेल्टमस हे सध्या पाकिस्तानच्या टीमचे मुख्य प्रशिक्षक अाहेत.

  सीजीएफचा दिलासा; कानउघाडणी करून साेडले

  राष्ट्रकुल स्पर्धेपुर्वीच भारतीय संघावर डाेपिंग सारख्या प्रकरणाची माेठी नामुष्की अाेढावणार हाेती. मात्र, काॅमनवेल्थ गेम्स फेडरेशनने (सीजीएफ) सखाेल चाैकशीनंतर भारतीय डाॅक्टर अमाेल पाटीलची कानउघडणी केली अाणि समज देऊन त्याला साेडण्यात अाले. अापल्या हातून इजेक्शन दिल्यानंतर सिरिंज नष्ट झाली नाही. त्यामुळे हा साऱ्या प्रकाराला समााेरे जावे लागले, अशी कबुली या वेळी डाॅक्टर पाटील यांनी दिली. या सुनावणीमुळे सीजीएफने भारताला दिलासा दिला.या प्रकरणाच्या सुनावणीचा अहवाल भारतीय संघाकडे साेपवण्यात अााला. त्यामुळे टीमने सुटकेचा निश्वास साेडला. कारण, याप्रकरणामुळे भारतीय संघ अडचणीत सापडण्याचे चित्र हाेते. ही सिरिंज स्पधॅेच्या दाेन दिवसांपूर्वी क्रीडाग्रामध्ये अाढळून अाली. त्यामुळे माेठ्या प्रमाणात चर्चा रंगली.

  काय अाहेत नियम
  - राष्ट्रकुल स्पधॅेदरम्यान नाे निडल पाॅलिसी अाहे. काेणत्याही खेळाडू वा संघाला नीडल सिरिंज ठेवता येत नाही.
  - क्रीडा स्पर्धेच्या परिसरात नीडलला ठेवण्यासाठी खास व्यवस्था करण्यात अालेली अाहे. यासाठी चाेख बंदाेबस्त असताे.
  - अाजारी खेळाडूंवर खास वैद्यकीय पथकाच्या देखरेखीत उपचार केले जातात.
  - खेळाडूला इंजेक्शन दिल्यानंतर तात्काळ ती सिरिंज नष्ट करावे लागते.

Trending