आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • CWG 2018: Indian Women\'s Table Tennis Team Won Gold, Defeated Singapore In Final

CWG 2018: भारतीय महिलांनी पहिल्यांदा टेबल टेनिसमध्ये पटकावले सूवर्ण, सिंगापूवर मात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोल्ड कोस्ट- कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारतीय महिला टेबल टेनिस टीमने रविवारी इतिहास रचला. कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारतीय महिला टेबल टेनिस टीमने पहिल्यांदा सूवर्ण पदकावर आपले नाव कोरले. भारतीय टीमने अंतिम फेरीत सिंगापूरवर 3-1 अशी मात केली. मोनिका बत्रा हिने अंतिम फेरीत धडाकेबाज कामगिरी करत आपल्या संघाला सूवर्णपदक मिळवून दिले.

 

कॉमनवेल्थ गेम्समध्ये चौथ्या दिवशी भारताने लागोपाठ पदकांची कमाई केली आहे. 69 किलो वजनी गटात वेटलिफ्टींगमध्ये भारताच्या पूनम यादवने सूवर्णपदक पटकावले. तत्पर्वी, भारताच्या नेमबाजांनी आपल्या पदकांचे खाते उघडले आहे. मनु भाकेर आणि हिना सिद्धु यांनी अनुक्रमे सूवर्ण आणि रौप्यपदकाची कमाई केली

 

दरम्यान, भारतने दिल्ली कॉमनवेल्थ गेम्समध्येही सर्वोकृष्ठ कामगिरी केली होती. भारतीय महिलांनी अंतिम फेरीत धडक दिली होती. मात्र, सिंगापूर संघाविरोधात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताने आतापर्यंत 7 सूवर्णपदके पटकावली आहेत. 

 

भारतने रविवारी ‍जिंकले 3 गोल्ड, एक सिल्व्हर, दोन ब्रॉन्झ
- टेबल टेनिस व्यतिरिक्त वेटलिफ्टर पूनम यादव आणि 16 वर्षीय शूटर मनु भाकर याने सूवर्णपदक पटकावले.  
- हिना सिद्धूने 10 मीटर एअर रायफल प्रकारात देशाला सिल्व्हर पदक मिळवून दिले.  
- वेटलिफ्टर विकास ठाकूर याने 94 किलोग्रॅम कॅटेगरीत ब्रॉन्झ पटकावले. शूटर रवी कुमार 10 मीटर एअर रायफल प्रकारात ब्रॉन्झ पदक पदकावण्यात यशस्वी ठरला.

 

पदकतालिका: टॉप 5 देश

देश गोल्ड सिल्व्हर ब्रॉन्झ  एकूण
ऑस्ट्रेलिया 31 25 28 84
इंग्लंड 19 19 9 47
कॅनडा 7 15 10 28
भारत 7 2 3 12
स्कॉटलंड 6 7 10

23

* पदतालिका भारतीय वेळेनुसार रविवार सायंकाळी 6 वाजेपर्यंत अपडेट आहे. 

 

 

बातम्या आणखी आहेत...