आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2018 मध्ये सलग 17 सामने जिंकल्यानंतर इंडियन वेल्सच्या फायनलमध्ये पराभूत झाला फेडरर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फेडररने 2018 मध्ये 3 फायनल मॅच खेळल्या त्यापैकी त्याचा हा पहिलाच पराभव आहे. - Divya Marathi
फेडररने 2018 मध्ये 3 फायनल मॅच खेळल्या त्यापैकी त्याचा हा पहिलाच पराभव आहे.

स्पोर्टस डेस्क - जगातील अव्वल क्रमांकाचा टेनिसपटून रॉजर फेडररला 2018 मध्ये पहिल्याच पराभवाचा सामना करावा लागला आहे. यावर्षी त्याने सलग 17 मॅच जिंकल्या होत्या. अर्जेंटिनाच्या जुआन मार्टिन डेल पोत्रो याने इंडियन वेल्सच्या फायनलमध्ये त्याचा 6-4 6-7(8) 7-6(2) ने पराभव केला. त्यापूर्वी पोत्रो ने 2009 मध्ये फेडररला यूएस ओपनच्या फायनलमध्ये पराभूत केले होते. 36 वर्षीय फेडरर जगातील सर्वात वयस्कर नंबर वन खेळाडू आहे. 


फेडररपेक्षा वरचढ पोत्रो
- फेडररने 115 पैकी 76 तर पोत्रोने 115 पैकी 83 सर्व्हीस पॉइंट घेतले. 
- पोत्रोने 115 पैकी 39, तर फेडररने 115 पैकी 32 रिटर्न पॉइंट मिळवले.  
- एकूण 230 पॉइंटपैकी पोत्रोला 122, तर फेडररला 108 पॉइंट मिळाले. 

 

यावर्षी खेळला तीन फायनल
- फेडररने 2018 मध्ये 3 फायनल खेळल्या. त्यापैकी त्याचा पहिलाच पराभव आहे. 
- ऑस्ट्रेलियन ओपन, रोटेरडॅम ओपनचे फायनल जिंकल्यानंतर तो इंडियन वेल्समध्ये पराभूत झाला. 
- ऑस्ट्रेलियन ओपनच्या फायनलमध्ये क्रोएशियाच्या मारीन सिलिच आणि रोटरडॅम ओपनमध्ये बुल्गेरियाच्या ग्रिगर दिमित्रोवला त्याने पराभूत केले. 

 

बातम्या आणखी आहेत...