आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लियाेनेल मेसीचे एकाच सामन्यात दाेन विक्रम; लीगमध्ये सर्वात वेगवान 100 गाेल करणारा एकमेव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बार्सिलाेना- यजमान बार्सिलाेनाच्या लियाेनेल मेसीने चॅम्पियन्स लीगमधील चेल्सीविरुद्धचा सामना गाजवला. त्याने या सामन्यात लीगमधील सर्वात वेगवान १०० व्या गाेलची नाेंद केली. लीगमधील या सामन्यात त्याने एका गाेलचे याेगदान दिले. त्याने अापल्या करिअरमधील १२३ व्या सामन्यात गाेलचे शतक साजरे करण्याचा पराक्रम गाजवला. यासह त्याने रियल माद्रिदच्या क्रिस्टियानाे राेनाल्डाेला मागे टाकले. राेनाल्डाेच्या नावे १३७ सामन्यांत १०० गाेलची नाेंद अाहे. याशिवाय मेसीने अापल्या करिअरमध्ये वेगवान गाेल केला. त्याने चेल्सीविरुद्ध  २ मिनिटे ८ व्या सेकंदाला गाेल केला. त्यानंतर त्याने दुसरा गाेल ६३ व्या मिनिटाला केला. याच्या बळावर बार्सिलाेनाने दुसऱ्या लेगमध्ये चेल्सीवर ३-० ने मात केली. अाॅसमाने (२० वा मि.) विजयात गाेलचे याेगदान दिले.

 

 पुढील स्‍लाइडवर पाहा, १२३ व्या मॅचमध्ये १०० वा गाेल,...