आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्जेंटिनाला वर्ल्ड कप जिंकून देऊ शकलो नाही तर आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्त होणार मेस्सी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेस्सी 123 अंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्यात त्याने 61 गोल केले आहेत. - Divya Marathi
मेस्सी 123 अंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्यात त्याने 61 गोल केले आहेत.

स्पोर्ट्स डेस्क - अर्जेंटिनाचा स्ट्रायकर लियोनल मेस्सीने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून संन्यास घेण्याचे संकेत दिले आहेत. तो म्हणाला, मला वाटते की रशियातील वर्ल्ड कप आम्ही जिंकू शकलो नाही तर ते माझ्यासाठी आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेण्याचे सर्वात मोठे कारण असेल. मेस्सीने यापूर्वी 27 जून 2016 ला निवृत्ती जाहीर केली होती. पण देशवासियांच्या विनंतीवरून तो पुन्हा संघात परतला. मेस्सी जगातील बेस्ट फुटबॉलर म्हणून ओळखला जातो. 123 इंटरनॅशनल मॅचमध्ये त्याने 61 गोल केले. अर्जेंटिनाने यापूर्वी 1986 मध्ये वर्ल्ड कप जिंकला होता. त्यावेळी डिएगो मॅराडोना कर्णधार होता. 


लोकांच्या अपेक्षा पूर्ण कराव्या लागतील 
- मेस्सी म्हणाला की, 2014 च्या वर्ल्डकप फायनलमध्ये जर्मनीकडून मिळालेल्या पराभवाच्या जखमा अजूनही ताज्या आहेत. तो म्हणाला, आम्ही सलग तीन फायनलमध्ये पोहोचलो. पण दुर्दैवाने पराभूत झालो. तिन्ही वेळा फायनलमध्ये प्रवेश करून फायदा झाला नाही असे वाटते. 
- आमच्याबाबत बरेच काही म्हटले गेले. टीका झाली. पण आता अपेक्षा पूर्ण कराव्याच लागतील. यावेळीही ते शक्य झाले नाही तर पुन्हा टीका सहन करावी लागले. ती संधी आम्ही देणार नाही. 
- फायनल हरल्यानंतर मी अनेकदा रडलोय. देशवासियांची स्वप्ने पूर्ण न करू शकल्यामुळे रडलोय. अर्जेंटिनाच्या प्रत्येक नागरिकाप्रमाणे माझेही स्वप्न वर्ल्डकप जिंकण्याचे आहे. 

बातम्या आणखी आहेत...