Home | Sports | Other Sports | Miami Masters Tennis Tournament; Jans Inner first champions in Miami

मियामी मास्टर्स टेनिस स्पर्धा; जाॅन्स इन्सर पहिल्यांदा मियामीत चॅम्पियन

वृत्तसंस्था | Update - Apr 03, 2018, 06:50 AM IST

अमेरिकेचा ३२ वर्षीय जाॅन इन्सर मियामी मास्टर्स टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीत चॅम्पियन ठरला. त्याने या स्पर्धेचा मास्टर्स

 • Miami Masters Tennis Tournament; Jans Inner first champions in Miami

  मियामी- अमेरिकेचा ३२ वर्षीय जाॅन इन्सर मियामी मास्टर्स टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीत चॅम्पियन ठरला. त्याने या स्पर्धेचा मास्टर्स किताबावर नाव काेरले. त्याने फायनलमध्ये जर्मनीच्या अलेक्झेंडर ज्वेरेवला पराभूत केले. त्याने ६-७, ६-४, ६-४ अशा फरकाने राेमहर्षक विजयाची नाेंद केली. यासह त्याला करिअरमध्ये पहिल्यांदा या स्पर्धेचे जेतेपद अापल्या नावे करता अाले. तसेच तब्बल दहा वर्षांनंतर अमेरिकन टेनिसपटू या स्पर्धेत किताबाचा मानकरी ठरला. दुसरीकडे झंुज अपयशी ठरल्याने ज्वेरेवला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्याने दमदार सुरुवात करताना सामन्यावर मजबुत पकड घेतली हाेती. मात्र, त्याला पुढील दाेन्ही सेटवरची अापली ही पकड कायम ठेवता अाली नाही. त्यामुळे त्याला पराभवाचा सामना करावा लागला. या राेमहर्षक विजयाच्या बळावर अमेरिकेच्या इन्सरने जागतिक क्रमवारीतही माेठी प्रगती साधली. त्याचा करिअरमधील जागतिक कम्रवारीत पाचव्या स्थानावरील ज्वेरेवचा हा विजय महत्वपूर्ण ठरला. याशिवाय त्याने सरस खेळी करताना अंतिम फेरीपर्यंचा पल्लाही यशस्वीपणे गाठला. त्यामुळेच त्याला फायनलमध्येही अापली विजयी माेहिम अबाधित ठेवता अाली. यासह त्याने करिअरमध्ये हा किताब पहिल्यांदा जिंकण्याचे माेठे यश संपादन केले.

  राॅडिकनंतर पहिला विजेता
  अमेरिकेच्या टेनिसपटू अॅडी राॅडिकनंतर जाॅन इन्सरने मियामी मास्टर्सचा किताब पटकवला. अशी कामगिरी करणारा राॅडिकनंतर इन्सर हा एकमेव अमेरिकन टेनिसपटू ठरला. राॅडिकने २०१० मध्ये या स्पर्धेच्या पुुरुष एकेरीचे जेतेपद पटकावले हाेते. त्यानंतर मात्र तब्बल दहा वर्षांपर्यत अमेरिकन टेनिसपटूला या स्पर्धेच्या अजिंक्यपदाच्या बहुमानला गवसणी घालता अाली नाही. हाच दुष्काळ इन्सरने दुर केला.

  काेकाे-बार्टीने जिंकले महिला दुहेरीचे विजेतेपद
  बिगरमानांकित काेकाे वांदेवेघेने अापली सहकारी बार्टीसाेबत महिला दुहेरीचा किताब पटकावला. या जाेडीने दुहेरीच्या फायनलमध्ये सहाव्या मानांकित क्रेजकाेवा अाणि सिनिअाकाेवावर मात केली. त्यांनी सरस खेळी करताना ६-२, ६-१ अशा फरकाने सरळ दाेन सेटमध्ये एकतर्फी विजयाची नाेंद केली.

  न खेळता नदाल नंबर वन; फेडररची घसरण

  २० वेळच्या ग्रँडस्लॅम चॅम्पियन राॅजर फेडररला सुमार खेळीचा फटका बसला. त्याला जागतिक क्रमवारीतील पुरुष एकेरीचे नंबर वनचे स्थान गमावावे लागले. न खेळतानाही जखमी राफेल नदाल नंबर वनच्या सिंहासनावर विराजमान झाला. या दाेघांमध्ये १०० रेटिंग गुणांचे अंतर अाहे. यातूनच नदालला अव्वल स्थानावर धडक मारता अाली. नदालच्या नावे ८७७० व फेडररचे ८६७० गुण अाहेत. क्राेएशियाच्या मरीन सिलिचने तिसरे स्थान कायम ठेवले. सिमाेना अव्वलस्थानी कायम : महिला गटात राेमानियाच्या सिमाेना हालेपने जागतिक क्रमवारीतील अापले नंबर वनचे स्थान कायम ठेवले. मियामी मास्टर्सचा किताब जिंकणारी स्टीफन्सने नववे स्थान गाठले.

  रामकुमार, अंकिता रैनाची प्रगती
  भारताच्या रामकुमार व अंकिता रैनाने प्रगती साधली. रामकुमारने करिअरमधील सर्वाेत्कृष्ट स्थान गाठले. ताे १३२ व्या स्थानावर अाला अाहे. महिला गटात अंकिताने २१२ वे स्थान गाठले.

Trending