Home | Sports | Other Sports | Mirabai chanu India lift the gold medal in 2018 commonwealth games

196 किलो वजन उचलून मिराबाई चानूने 12 विक्रम मोडले

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 06, 2018, 07:16 AM IST

मणिपूरची वेटलिफ्टर मीराबाई चानूने गोल्डकोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत पहिल्याच दिवशी भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. २३ वर्षां

 • Mirabai chanu India lift the gold medal in 2018 commonwealth games

  गोल्डकोस्ट- मणिपूरची वेटलिफ्टर मीराबाई चानूने गोल्डकोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत पहिल्याच दिवशी भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. २३ वर्षांच्या चानूने स्नॅचमध्ये ८६ व क्लीन अँड जर्कमध्ये ११० किलो वजन उचलले. तिने एकूण १९६ किलो वजन उचलले. ते रिओ ऑलिम्पिकची रौप्यपदक विजेतीने उचललेल्या वजनापेक्षा ४ किलोंनी जास्तच आहे. चानूने याआधी २०१७ मध्ये जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतही दोन सुवर्णपदके जिंकली आहेत. आता ती विश्व अजिंक्यपद आणि राष्ट्रकुल अशा दोन्ही स्पर्धांत सुवर्ण जिंकणारी एकमेव भारतीय महिला वेटलिफ्टर ठरली.

  गुरुराजालाही रौप्यपदक
  पुरुष वेटलिफ्टर पी. गुरुराजा यानेही ५६ किलो वजनी गटात रौप्यपदकाची कमाई केली. त्याने एकूण २४९ किलो वजन उचलले.

  गुरुराजने उघडले खाते..
  कॉमनवेल्थ गेम्समध्ये पहिल्याच दिवशी भारताच्या खाताच्या खात्यात रौप्य पदक पडले आहे. वेटलिफ्टिंगमध्ये 56 किलो वजनी गटात गुरुराजा यांनी 249 किलो वजन उचलून भारताला पहिल्या पदकाची कमाई करून दिली.

  पुढे पाहा, संबधित फोटो...

Trending