आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्राे फुटबाॅलपटू झाल्यानंतर सैन्य दलात नाेकरी; इजिप्तला मिळवून दिले वर्ल्डकपचे तिकीट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माेहंमद सालेह हा सर्वात वेगवान अाणि क्रिएटिव्ह खेळाडू अाहे. त्याच्यात प्रचंड उत्साह अाहे. मैदानावर खेळताना त्यांच्यात प्रचंड विनम्रता अाणि टीमसाठी वेगळे काहीतरी करण्याची सारखी धडपड असते. एका प्रतिभावंत खेळाडूसाठी अावश्यक असणारी सर्व प्रकारची वैशिष्ट्ये ही सालेहमध्ये अाहेत. 


त्याच्यासाेबत खेळताना मला या सर्व गाेष्टींचा उलगडा झाला. त्याच्यातील खेळाची शैली ही रिअल माद्रिदच्या गारेथ बेल अाणि बायर्न म्युनिचच्या अर्जेन राेबेनसारखी अाहे. फुटबाॅलची टेक्निक, स्किल, वेग, पाेझिशन अाणि खेळण्याच्या पद्धतीमुळेच इटलीचे प्रसारमाध्यमे सालेहला ‘इजिप्तचा मेसी’ म्हणतात, असे ईपीएलच्या सर्वात यशस्वी क्लब मँचेस्टर युनायटेडचे मॅनेजर जाेस मारिन्हाे म्हणाले. त्यांनी खास शब्दांत त्याचे कौतुक केले.  


इजिप्तच्या तीन टीम, ६ क्लबकडून खेळला : सालेहचा जन्म १५ जून १९९२ मध्ये इजिप्तमधील नागरिक या छाेट्याशा गावात झाला. अभ्यासात त्याची फारशी प्रगती झालेली नव्हती. शाळेत त्याला  खेळण्याची संधी मिळत हाेती. याच कारणामुळे ताे नियमित शाळेत जात असे. वेगवान धावपटू असल्याकारणाने त्याची शाळेच्या फुटबाॅल संघात निवड झाली हाेती. लहानपणी मला फुटबाॅलमध्ये खेळण्यात रस नव्हता. केवळ मन रमवण्यासाठीच मी यात सहभागी व्हायचाे. हा माझा छंद कधीही नव्हता,’असेही सालेह म्हणाला.   


सालेहने वयाच्या १४ व्या वर्षी पहिल्यांदा फुटबाॅलमध्ये अधिक गंभीरपणे खेळण्यास सुरुवात केली. यातून त्याला अल माेवकालाेन क्लबकडून खेळण्याची संधी मिळाली. मात्र, या क्लबसाेबत करारबद्ध हाेण्यापूर्वी त्याच्या कुटुंबीयांची माेठ्या प्रमाणात समजूत काढावी लागली. ताे फुटबाॅल खेळण्यासाठी पहाटेच घराबाहेर पडत असे. या क्लबपर्यंत पाेहोचण्यासाठी त्याला पाच बसेस बदलाव्या लागत हाेत्या. यासाठीची मेहनत घेताना त्याला या फुटबाॅलची अावड निर्माण झाली. ‘माेवकालाेन क्लबसाेबत तीन वर्षांसाठी करारबद्ध हाेण्याचा क्षण हा माझ्या अायुष्यातील सर्वात महत्त्वाचा हाेता,’ असेही त्याने सांगितले.  


सालेहने २०१३ मध्ये अापली मैत्रीण मागीसाेबत लग्न केले. त्याचा हा विवाह साेहळा चांगलाच चर्चेत राहिला. कारण या साेहळ्याला त्याने अख्ख्या गावाला निमंत्रित केले हाेते. त्यामुळे विवाह साेहळ्याला माेठ्या संख्येत अाप्तजन सहभागी झाले हाेते.  


त्याने यंदाच्या सत्रातील २३ सामन्यात १८ गाेल केले.  त्याची  सत्रातील कामगिरी उल्लेखनिय ठरली अाहे. हीच लय कायम ठेवताना त्याने अापल्या राष्ट्रीय संघाला एेतिहासिक यश मिळवून दिले. मागील तीन दशकापासून इजिप्तचा संघ वर्ल्डकपमधील प्रवेश करण्यासाठी प्रयत्नशील हाेता. मात्र, या टीमला अपेक्षित असे यश संपादन करता येत नव्हते. अखेर, २८ वर्षांपासूनच्या इजिप्त संघाच्या या प्रयत्नांना सालेहमुळे माेठे यश मिळाले. त्यामुळे या टीमला वर्ल्डकपमध्ये खेळण्याची संधी मिळाली. यामध्ये सालेहचे माेलाचे याेगदान राहिले अाहे. अाता इजिप्तकडून वर्ल्डकपमध्ये उल्लेखनिय कामगिरी करण्याचा त्याचा मानस अाहे. यासाठी त्याने सरावाला सुरुवात केली. पुढच्या वर्षी रशियात वर्ल्डकप हाेत अाहे. 

 

पुरस्कार

 - स्विस गाेल्डन प्लेयर अाॅफ द इयर (२०१३),   
- राेमा प्लेयर अाॅफ द सीझन (२०१५-१६)  
- बेस्ट अरब प्लेयर अाॅफ द इयर (२०१६)  
-  अाफ्रिका कप अाॅफ नेशन्स टीम अाॅफ द टुर्नामेंट (२०१७)
बातम्या आणखी आहेत...