आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Relationship With Friends Wife To Mother, List Of Cheaters Foul Players In Sports World

दिनेश कार्तिक ते टोनी पार्कर, जेव्हा या स्टार खेळाडूंना मिळाला जवळच्याकडून धोका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निकितासोबत दिनेश कार्तिक, (डावीकडे) तर मुरली विजय निकितासोबत (उजवीकडे) - Divya Marathi
निकितासोबत दिनेश कार्तिक, (डावीकडे) तर मुरली विजय निकितासोबत (उजवीकडे)

स्पोर्ट्स डेस्क- क्रीडा जगतात खेळाडूंचे जग जितके ग्लॅमरस आपल्याला दिसते पण पडद्यामागे तेवढेच ते धक्कादायक असते. टीम इंडियाला रोमांचक विजय मिळवून देणारा दिनेश कार्तिक सध्या चर्चेत आहे. पण एक काळ असा आला जेव्हा आपल्याच जवळच्या मित्राने व टीम इंडियातील सहकारी खेळाडूने धोका दिल्याने चर्चेत आला होता. तेव्हा दिनेश कार्तिकची पत्नी होती निकिता. मात्र, टीममधील सहकारी खेळाडू मुरली विजय व तिचे अफेयर सुरू झाले. आज आम्ही तुम्हाला क्रीडा जगतातील अशाच पाच बदनाम कहाणीची माहिती घेऊन आलो आहे. पत्नी व मित्रांकडून मिळाला धोका....

 

- तामिळनाडुचा स्टार विकेटकिपर दिनेश कार्तिक आणि मुरली विजय यांची मैत्री सर्वांनाच माहित होती. दोघांनी सोबतच फर्स्टक्लास क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली होती. 
- आयपीएलमध्येही हे दोघे बराचकाळ सोबत खेळत होते. मात्र आता परिस्थिती अशी आहे की दोघे एकमेकांचा चेहरा पाहाण्यासही तयार नाहीत. 
- झाले असे, की 2007 मध्ये आयपीएल-5 दरम्यान दिनेश कार्तिकने त्याची बालपणीची मैत्रिण निकीतासोबत लग्न केले, मात्र हे लग्न फार काळ टिकू शकले नाही. 
- 2012 मध्ये आयपीएल-5 दरम्यान कार्तिक आणि निकीता सोबत होते. याच दरम्यान निकीताचे मुरली विजयसोबत सूत जुळले. 
- या अफेअरची माहिती दिनेश कार्तिकला कळाल्यानंतर त्याने निकिताला सोडचिठ्ठी देण्याचे नक्की केले आणि लवकरच त्यांच्यात घटस्फोट झाला. घटस्फोट झाला तेव्हा निकिता प्रेग्नेंट होती. 
- घटस्फोट झाल्याबरोबर निकिताने मुरली विजयसोबत लग्न केले. दिनेश कार्तिकला हा फार मोठा धक्का होता. एवढा की त्याने नंतर निकिताने जन्म दिलेल्या मुलावर हक्क देखील सांगितला नाही. 
- दिनेशने 2015 मध्ये स्कॉश स्टार दीपिका पल्लीकलसोबत लग्न केले.

 

पुढील स्लाईडमध्ये वाचा अशाच बदनाम 5 कथा...

बातम्या आणखी आहेत...