आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सायना, सिंधू उपांत्यपूर्व फेरीत; साईप्रणीतचे अाव्हान संपुष्टात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वुहान - राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या सायना नेहवाल, रिअाे अाॅलिम्पिक पदक विजेत्या पी.व्ही. सिंधू अाणि नंबर वन के. श्रीकांतने विजयी माेहीम अबाधित ठेवताना गुरुवारी अाशियाई बॅडमिंटन चॅम्पियनशिपची उपांत्यपूर्व फेरी गाठली.   


दुसरीकडे भारताच्या साईप्रणीतला पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. तसेच अर्जुन अाणि रामचंद्रन श्लाेकचे पुुरुष दुहेरीतील अाव्हान संपुष्टात अाले. 
अव्वल मानांकित के. श्रीकांतला दुसऱ्या फेरीत विजयी घाेषित करण्यात अाले. त्याच्या प्रतिस्पर्धी वांग विंगने सामन्यातून एेनवेळी माघार घेतली. दुखापतीमुळे त्याला हा सामना अर्ध्यावर साेडावा लागला. दरम्यान, के. श्रीकांतने पहिल्या गेममध्ये ७-२ ने अाघाडी घेतली हाेती. अर्जुन अाणि रामचंद्रन श्लाेकचा पुरुष दुहेरीच्या दुसऱ्या फेरीत विजयासाठीचा प्रयत्न अपुर ठरला. अव्वल मानांकित ली ज्युनहुई अाणि लियूने सामन्यात भारताच्या जाेडीवर २१-११, २१-१९ ने मात केली.   


सिंधूचा सहज विजय : तिसऱ्या मानांकित पी.व्ही. सिंधूने महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीत सहज विजयाची नाेंद केली. तिने सामन्यात चेन झिअाझिनवर मात केली. तिने ४४ मिनिटांत २१-१२,  २१-१५ अशा फरकाने सामना जिंकला. यासह तिला पुढच्या फेरीतील अापला प्रवेश निश्चित करता अाला. पराभवाने झिअाझिन स्पर्धेतून बाहेेर झाली.

बातम्या आणखी आहेत...