Home | Sports | Other Sports | Sanjita Chanu wins Gold in weightlifting

गोल्ड कोस्ट : वेटलिफ्टर संजीता चानुला गोल्ड मेडल, स्नॅचमध्ये 84 किलो वजन उचलले

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 06, 2018, 10:52 AM IST

21व्या कॉमनवेल्थ स्पर्धेत भारताला आतापर्यंत दोन गोल्ड मेडल मिळाले आहेत. हे दोन्ही वेटलिफ्टींगमध्ये मिळाले आहेत.

 • Sanjita Chanu wins Gold in weightlifting
  संजीता चानूने गोल्ड कोस्टमध्ये सोन जिंकण्यापूर्वी 2014 ग्लास्गो कॉमनवेल्थमध्ये 53 किलो आणि 48 किलो कॅटेगरीमध्ये हे पदक जिंकले होते.

  गोल्ड कोस्ट - 21व्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये शुक्रवारी भारताला दुसरे गोल्ड मेडल मिळाले. वेटलिफ्टर संजिता चानूने 53 किलो वजनगटात हे पदक मिळवले. तिने एखूण 192 किलोग्रॅम (स्नॅचमध्ये 84 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 108 किलो) वजन उचलले. संजीता ने सलग दुसऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत मेडल जिंकले आहे. 2014 ग्लासगो कॉमनवेल्थमध्ये तिने 48 किलो कॅटेगरीमध्ये पदक जिंकले होते. भारताच्या मीराबाई चानूने गुरुवारी भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले होते.


  सुरुवातीपासूनच आघाडीवर राहिली चानू
  24 वर्षीय संजिता चानूने खेळादरम्यान तीन प्रयत्नांत 81, 82 आणि 84 किलो वजन उचलत कॉमनवेल्थ गेम्समधील विक्रम केला. त्यानंतर क्लीन अँड जर्कमध्ये पहिल्या प्रयत्नात 104 आणि नंतर 108 किलो वजन उचलले. तर तिसऱ्या प्रयत्नात तिने 112 किलो वजन उचलण्याचा प्रयत्न केला पण फाऊल झाला. अशाप्रकारे तिने एकूण 192 किलो वजन उचलत गोल्ड मेडलवर कब्जा मिळवला. सुरुवातीपासूनच ती आघाडीवर होती.


  संजिताने मोडला स्वातीचा विक्रम
  2014 ग्लासगो कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताच्या स्वातीने स्नॅचमध्ये 83 किलो वजन उचलून विक्रम केला होता. हा विक्रम संजिताने 84 किलो वजन उचलत शुक्रवारी मोडला.


  कोण आहे संजिता चानू
  - मणिपूरच्या मीराबाई चानू प्रमाणेच संजीताही कुंजाराणी देवीला आदर्श मानते.
  - ती रेल्वेमध्ये नोकरी करते. वयाच्या 20 व्या वर्षीत 2014 ग्लासगो कॉमनवेल्थ गेम्समध्ये तिने पहिले पदक जिंकले होते.
  - 2017 मध्ये अर्जुन पुरस्कारांच्या यादीत नाव नसल्याने तिने विरोध केला होता. हायकोर्टातही तिने याचिका केली होती. पण तिची याचिका फेटाळण्यात आली.

 • Sanjita Chanu wins Gold in weightlifting
 • Sanjita Chanu wins Gold in weightlifting
 • Sanjita Chanu wins Gold in weightlifting

Trending