आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिअाे अाॅलिम्पिकनंतर सिंधूचा 5 फायनलमध्ये अनपेक्षितपणे पराभव; इंडिया अाेपनमध्ये उपविजेती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- रिअाे अाॅलिम्पिकमधील राैप्यपदक विजेत्या पी.व्ही. सिंधूचा सलग दुसऱ्यांदा इंडिया अाेपनचा किताब जिंकण्याचा प्रयत्न अपुरा ठरला. तिला रविवारी अापल्या घरच्या मैदानावरील इंडिया अाेपन बॅडमिंटन स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. अमेरिकेच्या बेईवेन झांगने महिला एकेरीच्या फायनलमध्ये सिंधूचा पराभव केला. दुसरीकडे पाचव्या मानांकित क्रिस्टियन अाणि पेडेर्सेनने मिश्र दुहेरीचे विजेतेपद पटकावले. त्यांनी प्रवीण जाॅर्डन अाणि अाकताविंन्तीचा पराभव केला.


अमेरिकेच्या बेईवेन झांगनेे २१-१८, ११-२१, २२-२० अशा फरकाने राेमहर्षक विजयाची नाेंद केली. यासह तिने महिला गटाचा किताब अापल्या नावे केला. या पराभवामुळे सिंधूचे सत्रात विजेतेपद जिंकण्याचे स्वप्न भंगले. तिने विजयासाठी शर्थीची झुंज दिली. मात्र, तिला समाधानकारक खेळी करता अाली नाही. त्यामुळे तिला पराभवाला सामाेरे जावे लागले.  तिने गत वर्षी या स्पर्धेचे विजेेतेपद पटकावले हाेते. मात्र, 


यंदा तिला या स्पर्धेतील किताबावरचे अापले वर्चस्व अबाधित ठेवता अाले नाही. सायनाच्या पराभवानंतर सिंधू्कडून यजमानांना अाशा हाेती. 


चीनचा शी युकी पुरुष गटात ठरला चॅम्पियन
चीनच्या युवा शी युकीने पुरुष एकेरीत चॅम्पियन हाेण्याचा बहुमान पटकावला. त्याने फायनलमध्ये तैवानच्या चाेऊ तिएनचा पराभव केला. त्याने २१-१८, २१-१४ अशा फरकाने एकतर्फी विजय संपादन केला. यासह ताे अवघ्या ४७ मिनिटांमध्ये एकेरीच्या किताबाचा मानकरी ठरला. दुसरीकडे क्रिस्टियन अाणि पेडेर्सेनने मिश्र दुहेरीचे विजेतेपद पटकावले. या जाेडीने अंतिम सामन्यात बिगरमानांकित प्रवीण जाॅर्डन अाणि अाकताविंन्तीचा पराभव केला. पाचव्या मानांकित जाेडीने २१-१४, २१-१५ अशा फरकाने विजय संपादन केला.

बातम्या आणखी आहेत...