Home | Sports | Other Sports | Struggle stories of three players

फुटबॉल विश्वचषकाच्या मैदानावरून तीन खेळाडूंच्या तीन संघर्षगाथा...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jun 25, 2018, 06:00 AM IST

फिफा विश्वचषक सुरू होऊन फक्त ११ दिवस झाले, पण अनेक खेळाडू आणि संघांनी सर्वांचेच लक्ष वेधले.

 • Struggle stories of three players

  फिफा विश्वचषक सुरू होऊन फक्त ११ दिवस झाले, पण अनेक खेळाडू आणि संघांनी सर्वांचेच लक्ष वेधले. विश्वचषकातील कुणी खेळाडू कधी काळी शहरातील भिंती रंगवायचा तर कुणी वर्षानुवर्षे केवळ दूध-ब्रेडवर जगायचा. फक्त मेहनत करत राहणे ही एकच बाब सर्वात समान होती. फिफाच्या मैदानावरील अशाच ३ संघर्षपूर्ण कथा...

  जीझस : ६ वर्षांपूर्वी भिंती रंगवत असे, आता टॉप फॉरवर्ड खेळाडू
  - गॅब्रियल जीझस ब्राझीलचा फॉरवर्ड खेळाडू आहे.
  - ब्रँड व्हॅल्यू : 350 कोटी

  ब्राझीलचा गॅब्रियल जीझस फिफा -२०१८ मध्ये त्याच्या संघासाठी टॉप फॉरवर्ड खेळाडू ठरत आहे. २१ वर्षांचा जीझस ६ वर्षांपूर्वी ब्राझीलच्या गल्ल्यांमध्ये भिंती, रस्ते व दुभाजकांना रंगवत असे. दिवसाकाठी तो १५० ते २०० रुपये कमवत असे. लहान वयातच जीझसच्या वडिलांचे निधन झाले. आई व भावासह त्याला इंग्लंड सोडून ब्राझीलमध्ये यावे लागले. वयाच्या ६ वर्षांपासून त्याला फुटबॉल आवडायचे. रंगकामानंतर त्याचा सर्व वेळ मैदानावर जात असे. २०१३ मध्ये जीझसच्या प्रशिक्षकांनी त्याला क्लबमध्ये दाखल केले. जीझसने ४७ सामन्यांत १६ गोल केले. २०१५ मध्ये त्याची ब्राझील अंडर-२३ व २०१६ मध्ये राष्ट्रीय संघांत निवड झाली. २०१७ मध्ये मँचेस्टर युनायटेडकडून २४० कोटींचे कंत्राट मिळाले. आता ब्रँड व्हॅल्यू ३५० कोटींपेक्षा जास्त आहे.

  पुढील स्लाइडवर वाचा,

  - लुकाकू : अनेक वर्षे दूध-ब्रेडवर जगला, सध्या आहे उत्तम स्ट्रायकर

  - हानेस : घोड्यांच्या मैदानावर प्रॅक्टिस, आता मेसीला रोखले

 • Struggle stories of three players

  हानेस : घोड्यांच्या मैदानावर प्रॅक्टिस, आता मेसीला रोखले
  - आइसलँडचा गोलकीपर आहे हानेस हालडोरसन.
  - ब्रँड व्हॅल्यू: 150 कोटी

   

  आइसलँडचा गोलकीपर हानेस हालडोरसनने अर्जेंटिनाविरुद्ध सामन्यात लियोनल मेसीचा गोल अडवला आणि  अर्जेंटिनाला ड्रॉ खेळण्यासाठी भाग पाडले. हानेस हालडोरसनने संघाच्या संघर्षाबद्दल सांगितले. तो म्हणाला, ‘आमच्या देशाची लोकसंख्या साडेतीन लाख आहे.  


  कोणीही आम्हाला गांभीर्याने घेत नव्हते. आमच्याकडे मैदान नव्हते. घोडे बांधले जाणाऱ्या मैदानावर दिवसा आम्ही प्रॅक्टिस करायचो. मी गोलकीपर होतो. डाइव्ह मारताना मैदानावरील वस्तू हाताला लागायची. खेळाडू निराश व्हायचे. नंतर काही सिद्ध करण्याऐवजी स्वत:साठी खेळण्याचा आम्ही निर्णय घेतला. यंदाच्या कामगिरीने आम्ही खुश आहोत, पण समाधानी नाही. २०१८ मध्ये आलो आहोत, २०२२ मध्ये ताकद दाखवू.’

 • Struggle stories of three players

  लुकाकू : अनेक वर्षे दूध-ब्रेडवर जगला, सध्या आहे उत्तम स्ट्रायकर
  - रोमेलू लुकाकू बेल्जियमचा स्ट्रायकर आहे. 
  - ब्रँड व्हॅल्यू : 900 कोटी 

   

  बेल्जियमच्या रोमेलू लुकाकूने २ सामन्यात ४ गोल करून रोनाल्डोची बरोबरी केली आहे. इंग्लंडचा हॅरीकेन ५ गोलसह पहिल्या क्रमांकावर आहे.  सध्या त्याची ब्रँड व्हॅल्यू ९०० कोटींवर आहे.  लुकाकूचा प्रवास खूप खडतर होता. तो म्हणतो, ‘मी शाळेत असताना ३ ते ४ वर्षांपर्यंत  घरात केवळ दूध व ब्रेड खाण्यास मिळायचे. आपण गरीब आहोत काय, असा प्रश्न मी आईला केला. तर हीच आपली खाद्यसंस्कृती असे उत्तर तिने दिले. एके दिवशी दुधात पाणी मिसळताना मी आईला पाहिले अन् सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली. त्या दिवसापासून फुटबॉलच माझे सर्वस्व झाले. राष्ट्रीय संघात प्रवेश मिळाल्यावर आजोबांनी फोन करून ‘आता माझ्या लेकीची काळजी घे..’ असे म्हटले. त्यावर मी म्हणालो, तुमची मुलगी माझी आई आहे. त्यामुळे निश्चिंत राहा. तेव्हापासून दिलेला शब्द पाळत आहे.’

Trending