Home | Sports | Other Sports | success of aurangabad runner sakshi champalal

औरंगाबादच्या साक्षीने 3.5 लाख धावपटूंना मागे टाकत 100 मीटर अंतर 12.06 सेकंदांत कापले

एकनाथ पाठक | Update - May 29, 2018, 02:56 AM IST

औरंगाबादची अवघ्या साडेतेरा वर्षांची धावपटू साक्षी चंपालाल चव्हाणने एका चाचणीत १०० मीटरचे अंतर अवघ्या १२.०६ सेकंदांत गाठण

 • success of aurangabad runner sakshi champalal

  अाैरंगाबाद - औरंगाबादची अवघ्या साडेतेरा वर्षांची धावपटू साक्षी चंपालाल चव्हाणने एका चाचणीत १०० मीटरचे अंतर अवघ्या १२.०६ सेकंदांत गाठण्याचा पराक्रम केला. अाता तिला गतवर्षापर्यंतचा जगातील सर्वात वेगवान धावपटू युसेन बाेल्टच्या जमैकातील मैदानावर प्रशिक्षणासाठी संधी मिळाली आहे.

  १ जूनपासून धर्मशाला येथे एक महिन्याचे प्रशिक्षण घेतल्यानंतर जानेवारी २०१९ मध्ये ती जमैकात जाणार अाहे. औरंगाबादेत इयत्ता आठवीत शिकत असलेल्या साक्षीची जिद्द व मेहनत पाहून औरंगाबाद मनपा क्रीडा अधिकारी संजीवप्रसाद बालय्या यांनी तिला ५ हजारांचे शूज भेट दिले होते. ते घालूनच साक्षीने हा पराक्रम केला. प्रशिक्षक सुरेंद्र माेदी अाणि पूनम नवगिरेच्या मार्गदर्शनाली ती आगेकूच करत आहे.

  निवड समिती अवाक‌्
  साक्षीने महिलांच्या १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत गाठलेले १२.०६ सेकंदांचे टायमिंग निवड समितीला अवाक् करणारे ठरले. तसेच तिने २०० मीटरचे अंतर २६.०० सेकंदांत गाठले. यामुळे तिला या गटासाठीही अापला प्रवेश निश्चित करता अाला.

  ३.५ लाखांतून १० प्रतिभावंत पात्र
  स्पीड स्टारने प्रतिभावंत धावपटूंच्या शाेधासाठी ६ महिन्यांची माेहीम राबवली. ६०० जिल्ह्यांतून ३ लाख ५० हजार धावपटूंची चाचणी घेतली. त्यातून १४ अाणि १६ वर्षांखालील वयाेगटात १०० खेळाडूंची निवड केली होती. अंतिम चाचणीत १४ अाणि १६ वर्षांखालील ५ मुले व ५ मुलींची निवड झाली.

  १३ व्या वर्षी ९५ वर्षांपूर्वीच्या धावपटूंपेक्षा सरस कामगिरी
  साक्षीने वयाच्या १३ व्या वर्षी केलेली कामगिरी ९५ वर्षांपूर्वीच्या जागतिक अव्वल क्रीडापटूंपेक्षा सरस आहे. साक्षीने १०० मीटर शर्यतीत १९२२ मधील एम्मी हाऊक्स (१२.८) अाणि १९२३ मधील मेरी लीन्स (१२.०८), मारिया (१२.०८) यांनाही मागे टाकले.

Trending