आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सायना नेहवालसमाेर ताई यिंगचे तगडे अाव्हान; येत्या 14 मार्चपासून अाॅल इंग्लंड चॅम्पियनशिप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बर्मिंगहॅम- माजी नंबर वन सायना नेहवाल अाणि रिअाे अाॅलिम्पिकची राैप्यपदक विजेत्या बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूची नजर अाता पुढच्या महिन्यात हाेणाऱ्या १०,००,००० डाॅलरच्या बक्षिसाच्या किताबावर लागली अाहे. भारताच्या या दाेन्ही बॅडमिंटनपटू अाता अाॅल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये खेळणार अाहे. ही स्पर्धा १४ ते १८ मार्चदरम्यान इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथे रंगणार अाहे. यासाठी नुकताच ड्राॅ घाेषित करण्यात अाला.   


जागतिक क्रमवारीत ११ व्या स्थानावर असलेल्या सायनाला महिला एकेरीच्या सलामीला ताई जू यिंगच्या अाव्हानाला सामाेरे जावे लागेल. यातून भारताच्या खेळाडूला ताईला पराभवाची परतफेड करण्याची संधी अाहे. गत सामन्यात तिला ताईविरुद्ध लढतीत पराभवाचा सामना करावा लागला हाेता. मात्र, अाता याच पराभवाचा वचपा काढण्यासाठी सायना उत्सुक अाहे.  
तसेच सिंगापूर अाेपन चॅम्पियन प्रणीतला सलामी सामन्यात माजी नंबर वन साेन वानच्या अाव्हानाला सामाेरे जावे लागेल.   


सिंधूची लढत चाेचुवाेंगशी

जागतिक स्पर्धेतील पदक विजेत्या सिंधूला यंदाच्या या चॅम्पियनशिपमध्ये दमदार सुरुवात करण्याची संधी अाहे. तिचा सलामी सामना थायलंडच्या पाेर्नपावी चाेचुवाेंगशी हाेईल. यात तिला सहज बाजी मारून दुसरी फेरी गाठता येईल. त्यानंतर तिचा दुसऱ्या फेरीतील सामना अमेरिकेच्या बीवेन यंगशी हाेईल. बीवेनने इंडिया अाेपन फायनलमध्ये सिंधूला पराभूत केले हाेते. यातून सिंधूला याच पराभवाची परतफेड करण्याचीही संधी अाहे. 


श्रीकांतला तिसरे मानांकन

जागतिक क्रमवारी तिसऱ्या स्थानावर असलेल्या के. श्रीकांतही पुरुष एकेरीत दमदार सुरुवात करू शकेल. त्याचा सलामी सामना फ्रान्सच्या ब्राइस लेवरडेझशी हाेईल. या गटात त्याला तिसरे मानांकन मिळाले अाहे. तसेच बी.साईप्रणीत अाणि प्रणयची पहिल्या फेरीतील वाट अधिक खडतर अाहे.

बातम्या आणखी आहेत...