Home | Sports | Other Sports | Virat Kohli get angry and denied to take orange cap

IPL2018 : विराटने नाकारली ऑरेंज कॅप, म्हणाला-ही कॅप फेकून द्यावीशी वाटते

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 18, 2018, 04:57 PM IST

सामन्यानंतर बोलताना तर तो ही कॅप फेकून द्यावीशी वाटत असल्याचे तो म्हणाला.

 • Virat Kohli get angry and denied to take orange cap

  स्पोर्ट्स डेस्क - विराट कोहलीने मुंबईविरोधातील आयपीएल सामन्यात 92 धावांची तुफानी खेळी केली. या खेळीमुळे आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज तो बनला. त्याचबरोबर यंदाच्या पर्वातीलदेखिल सर्वाधिक धावा करणारा फलंदाज तो ठरला. पण त्या मोबदल्यान मिळणारा ऑरेंज कॅपचा सन्मान त्याने नाकारला. त्याचे कारण म्हणजे सामन्यातील काही गोष्टींमुळे तो प्रचंड संतापला होता. सामन्यानंतर बोलताना तर तो ही कॅप फेकून द्यावीशी वाटत असल्याचे म्हणाला.


  नेमके काय घडले..
  मुंबई इंडियन्सने कालच्या सामन्यात प्रथम फलंदाजी केली. त्यांनी रोहित शर्माने बेंगळुरूच्या गोलंदाजांना तुफानी फटकेबाजी केली. मॅचच्या 19 व्या ओव्हरमध्ये एका चेंडूवनर हार्दीक पांड्याला अंपायरने नॉटआऊट दिले. या निर्णयाने कोहली प्रचंड संतापला होता. त्याच्या मते पांड्या आऊट होता. पण अंपायर्सने त्याला नाबाद ठरवले. कोहली वारंवार स्क्रीन दाखवून पंचांशी बोलत होता. त्याचा प्रचंड संताप स्पष्टपणे दिसत होता. विशेष म्हणजे यानंतर हार्दीकने पुढच्या दोन चेंडूवर दोन सिक्सर लगावले. त्यामुळे कोहलीचा राग जास्तच वाढल्याचे पाहायला मिळाले.


  विशेष म्हणजे मुंबईची इनिंग संपल्यानंतरही कोहली वारंवार अंपायर्सना स्क्रीन दाखवून त्यांचा निर्णय चुकीचा असल्याचे सांगत होता. त्याचा राग शांत होतच नव्हता. त्यात बेंगळुरूच्या फलंदाजांच्या अपयशाने त्याचा पारा अधिक चढला. रागात त्याने मुंबईच्या गोलंदाजांची धुलाईदेखिल केली.

  पुढे वाचा, विराटने दिला ऑरेंज कॅप स्वीकारण्यास नकार

 • Virat Kohli get angry and denied to take orange cap

  ऑरेंज कॅप स्वीकारण्यास नकार 
  कोहलीने सामन्यात 92 धावा केल्या. त्याच्या या खेळीमुळे तो ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला. मॅचनंतर त्याला ही ऑरेंज कॅप देण्यात आली. पण त्यावेळी कोहलीचा राग स्पष्टपणे जाणवला. त्याने ऑरेंज कॅप घ्यायलाच नकार दिला. मला ही कॅप परिधान करण्याची इच्छाच नाही. मला ही फेकून द्यावीशी वाटत आहे, असे कोहली यावेळी बोलताना म्हणाला. मात्र अंपायर्सच्या निर्णयाशिवाय त्याच्या रागाचे आणखी एक कारण होते. 

   

  पुढे वाचा, काय होते कोहलीच्या नाराजीचे दुसरे कारण...
   

 • Virat Kohli get angry and denied to take orange cap

  काय म्हणाला कोहली..
  कोहलीने ऑरेंज कॅफ स्वीकारण्यास नकार दिला. पण अंपायर्सचा चुकलेला निर्णय हेच एकमेव कारण यामागे नव्हते. कारण मॅचनंतर बोलताना विराट म्हणाला की, मी सध्या कॅपचा विचार करत नाही. तर आम्ही एवढ्या विकेट कशा गमावल्या यावर मला लक्ष केंद्रीत करायचे आहे. म्हणजेच बेंगळुरूच्या टीममधील इतर दिग्गज फलंदाजांवर त्याचा संताप असल्याचे स्पष्ट जाणवत होते.  

 • Virat Kohli get angry and denied to take orange cap
 • Virat Kohli get angry and denied to take orange cap

Trending