Home | Sports | Other Sports | Weightlifter Deepak Lather Won Bronze Medal In Commonwealth Games

कॉमनवेल्थ : वेटलिफ्टींगमध्ये आणखी एक पदक, दीपक लाठरने केली ब्राँझ पदकाची कमाई

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 06, 2018, 03:21 PM IST

वेटलिफ्टींगमध्ये यापूर्वी दोन गोल्ड आणि एक सिल्व्हर मेडल भारताच्या खात्यात आलेले आहेत.

 • Weightlifter Deepak Lather Won Bronze Medal In Commonwealth Games
  दीपकने एकूण 295 किलो (स्नॅचमध्ये 136 आणि क्लीन अँड जर्कमध्ये 159 किलो) वजन उचलले.

  - 18 वर्षांच्या दीपक लाठर याची ही पहिलीच राष्ट्रकुल स्पर्धा आहे.

  - दीपकने कॉमनवेल्थ गेम्स चॅम्पियनशिप 2017 मध्ये भारतासाठी 3 मेडल जिंकले होते.

  गोल्ड कोस्ट - राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय वेटलिफ्टर्ची उत्कृष्ट कामगिरी सुरुच आहे. या स्पर्धेत दीपक लाठरने 69 किलो वजनगटात ब्राँझ मेडल जिंकले. त्यापूर्वी गुरुराजा पुजारीने सिलव्हर तर सिखोम मीराबाई चानू आणि संजिता चानू या दोघींनी देशासाठी सुवर्ण पदकाची कमाई केली. दीपकने 15 व्या वर्षी 258 किलो वजन उचलत राष्ट्रीय विक्रम रचला होता.


  4 किलोने मागे पडला दीपक
  दीपकने एकूण 295 किलो (स्नॅचमध्ये 136 आणि क्लीन अँड जर्कमध्ये 159 किलो) वजन उचलले. त्याने स्नॅचमध्ये पहिल्या प्रयत्नात 132 आणि दुसऱ्या प्रयत्नात 136 किलो वजन उचलले होते. त्यानंतर 138 किलोचा प्रयत्न केला. पण फाऊल झाला. क्लीन अँड जर्कमध्ये पहिल्याच प्रयत्नात 155 किलो आणि दुसऱ्या प्रयत्नात 159 किलो वजन उचलले. तिसऱ्या प्रयत्नात 162 किलो वजन उचलण्याचा प्रयत्न केला पण फाऊल झाला. सुवर्णपदक विजेत्याने त्याला अवघ्या 4 किलो वजनाने पछाडले. स्नॅच आणि क्लीन अँड जर्कच्या अखेरच्या प्रयत्नात यश आले असते तर त्याला सुवर्ण मिळवण्याची संधी होती.


  15 वर्षी रचला राष्ट्रीय विक्रम
  - दीपकचा जन्म 25 मार्च 2000 मध्ये दिल्लीत झाला होता.
  - दीपक 2000 मध्ये वयाच्या 15 व्या वर्षी पांचव्या कॉमनवेल्थ यूथ गेम्समध्ये नॅशनल विक्रम रचून चर्चेत आला होता. त्याने 62 किलो वर्गात गोल्ड जिंकले होते. त्याने स्नॅचमध्ये 120 आणि क्लीन अँड जर्कमध्ये 138 किलोसह एकूण 258 किलो वजन उचलले होते. 15 व्या वर्षी एवढे वजन उचलणारा तो पहिला भारतीय होता.


  2017 कॉमनवेल्थ गेम्स चॅम्पियनशिपमध्ये जिंकली तीन पदके
  दीपक ने 2017 मध्ये कॉमनवेल्थ गेम्स चॅम्पियनशिपमध्ये दोन गोल्डसह तीन मेडल जिंकले होते. त्याने ज्युनिअर मेन 69 किलो वजनगटात गोल्ड जिंकले होते. तर यूथ मेन 69 किलो वजनगटातही सुवर्णपदक मिळवले होते. त्याशिवाय सीनिअर मेन 69 किलो वजनगटात त्याने ब्राँझ पदक मिळवले होते.

 • Weightlifter Deepak Lather Won Bronze Medal In Commonwealth Games

Trending